सानिया-शोएबच्या घरी पाळणा हलणार; ट्विटरवर दिली गोड बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 21:08 IST2018-04-23T21:08:42+5:302018-04-23T21:08:59+5:30

सोशल मीडियावर अनेकांकडून दोघांचं अभिनंदन

sania mirza to become mother in october | सानिया-शोएबच्या घरी पाळणा हलणार; ट्विटरवर दिली गोड बातमी

सानिया-शोएबच्या घरी पाळणा हलणार; ट्विटरवर दिली गोड बातमी

नवी दिल्ली: टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच आई होणार आहे. ऑक्टोबरमध्ये सानिया आणि शोएबच्या घरी पाळणा हलणार आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिकनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. यावरुन सानिया मिर्झा गरोदर असल्याची शक्यता वर्तवली जात होती. यानंतर सानिया मिर्झाच्या वडिलांनी या वृत्ताला दुजोरा दिला. 

'सानिया गरोदर असल्याची माहिती खरी आहे. ऑक्टोबरमध्ये सानिया आई होईल, अशी अपेक्षा आहे,' असं सानियाचे वडिल आणि प्रशिक्षक इमरान मिर्झा यांनी सांगितलं. सानिया आणि शोएबनं फोटो ट्विट करताना #MirzaMalik हा हॅशटॅग वापरला. या फोटोत एका बाजूला मिर्झा, तर दुसऱ्या बाजूला मलिक लिहिलेलं दिसतं आहे. या दोघांच्या मध्ये मिर्जा-मलिक लिहिण्यात आलं आहे. या दोघांनी केलेलं ट्विट आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केलं आहे. अनेकांनी त्यांचं अभिनंदनही केलं आहे. सानिया आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकच्या लग्नाला 12 एप्रिल रोजी 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे सानिया ऑक्टोबर 2017 पासून टेनिस खेळलेली नाही. 



 


सानिया मिर्झानं एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोवा फेस्ट-2018 मध्ये सहभाग घेतला होता. स्त्री-पुरुष भेदभाव या विषयावर या फेस्टमध्ये चर्चा झाली होती. यावेळी बोलताना सानियानं होणाऱ्या अपत्याचा उल्लेख केला होता. 'मी आणि माझे पती याविषयी बोललो आहोत. जेव्हा आम्हाला मूल होईल, तेव्हा त्याचं आडनाव मिर्झा-मलिक असेल, असं आम्ही ठरवलंय,' असं सानियानं म्हटलं होतं. 

Web Title: sania mirza to become mother in october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.