रॉजर फेडररची 'रॉजर कप'मधून माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 12:43 IST2018-07-24T12:43:05+5:302018-07-24T12:43:26+5:30

स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने पुढील महिन्यात होणा-या रॉजर कप टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे.

Roger Federer withdraws from Roger Cup | रॉजर फेडररची 'रॉजर कप'मधून माघार

रॉजर फेडररची 'रॉजर कप'मधून माघार

ठळक मुद्देफेडररने दोनवेळा रॉजर कप जिंकला आहे.

कॅनडा - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने पुढील महिन्यात होणा-या रॉजर कप टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. जागतिक क्रमावारीत दुस-या स्थानावर असलेल्या फेडररने वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले.



रॉजर कपमध्ये खेळणार नसल्याचे दुःख वाटते. गतवर्षी या स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी केली आणि कॅनेडियन चाहत्यांसमोर खेळण्यास नेहमी आवडते. मी खूप विचारपूर्वक या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माझ्या शुभेच्छा. सर्वांची पुन्हा एकदा माफी मागतो, अशी प्रतिक्रिया फेडररने दिली. 
विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत केव्हिन अँडरसनकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर फेडरर अन्य स्पर्धांतही खेळलेला नाही. त्याने दोनवेळा रॉजर कप जिंकला आहे. मागील चार मोसमात त्याने केवळ एकदाच या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. 
दरम्यान, जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला राफेल नदाल, विम्बल्डन विजेता नोव्हाक जोकोव्हिच आणि अँडी मरे हे या स्पर्धेत खेळणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. 4 ते 12 ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.  

Web Title: Roger Federer withdraws from Roger Cup