शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

नदाल व फेडररने गाठली विक्रमांची उंची; टाकले दिग्गजांना मागे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 09:11 IST

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानांवर असलेले राफेल नदाल आणि रॉजर फेडरर या मॉडर्न एरातील दोन दिग्गज टेनिसपटूंनी विक्रमांची नवी उंची गाठली आहे. ATP रँकिंगमध्ये या दोघांनी नोंदवलेला विक्रम सहजासहजी मोडणे  कोणालाही शक्य नाही.

मुंबई - जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानांवर असलेले राफेल नदाल आणि रॉजर फेडरर या मॉडर्न एरातील दोन दिग्गज टेनिसपटूंनी विक्रमांची नवी उंची गाठली आहे. ATP रँकिंगमध्ये या दोघांनी नोंदवलेला विक्रम सहजासहजी मोडणे  कोणालाही शक्य नाही. फेडररने ७५० आठवडे क्रमवारीत अव्वल पाच खेळाडूंत आपले स्थान कायम राखले. यासह त्याने महान टेनिसपटू जिम्मी कोनोर्स ( ७०६ आठवडे) यांना पिछाडीवर टाकले. या विक्रमात नदाल ६३९ आठवड्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ७५० आठवडे अव्वल पाच खेळाडूंत स्थान कायम राखणारा फेडरर हा जवळपास ३०० आठवडे ATP रँकिंगमध्ये अव्वल स्थानी होता. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. त्याव्यतिरिक्त तो ४५० आठवडे दुसऱ्या स्थानी होता. त्याने नुकतीच रॉजर कप स्पर्धेतून माघार घेतली. 

(रॉजर फेडररची 'रॉजर कप'मधून माघार)

नदालने पीट सॅम्प्रास यांचा अव्वल २५ मध्ये सर्वाधिक काळ राहण्याच्या विक्रमाला मागे टाकले. या विक्रमात ६९५ आठवड्यांसह तो सहाव्या स्थानी आहे. पहिल्या पाच जणांत आंद्रे आगासी (९१६), फेडरर (९१५), कोनोर्स (८६४), जॉन मॅक्इनरो (७६६) आणि इव्हान लेंडल (७६०) यांनी स्थान पटकावलेले आहे.नदालच्या खात्यात ८३१० गुण आहेत आणि रॉजर कप जिंकल्यास त्यात १५१० गुणांची भर पडेल. फेडररची गुणसंख्या ७०८० अशी आहे, परंतु रॉजर कपमधून माघार घेतल्यामुळे ती ५४८० पर्य घसरू शकते. त्यामुळे वर्षाच्या अखेरपर्यंत नदालच्या अव्वल स्थानाला धोका राहणार नाही. 

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररTennisटेनिसSportsक्रीडा