शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

रॉजर फेडरर विजयाचे शतक नोंदविण्यास उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 5:25 AM

लंडन : रॉजर फेडरर बुधवारी विम्बल्डनमध्ये १०० वा विजय नोंदविण्यासह राफेल नदालविरुद्ध आणखी एका उपांत्य लढतीसाठी सज्ज राहण्याच्या प्रयत्नात ...

लंडन : रॉजर फेडरर बुधवारी विम्बल्डनमध्ये १०० वा विजय नोंदविण्यासह राफेल नदालविरुद्ध आणखी एका उपांत्य लढतीसाठी सज्ज राहण्याच्या प्रयत्नात आहे.पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत ३० वर्षांवरील पाच खेळाडूंनी स्थान मिळविले आहे. टेनिस जगतातील दोन सर्वाधिक यशस्वी खेळाडू फेडरर व नदाल कारकिर्दीत ४० व्यांदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास २००८ नंतर प्रथमच येथे हे दोन दिग्गज एकमेकांविरुद्ध खेळतील. नदालने २००८ मध्ये फेडररचा अंतिम लढतीत पराभव केला होता. ही लढत या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत शानदार अंतिम लढत मानली जाते. आठवेळचा चॅम्पियन फेडररला उपांत्य फेरीसाठी जपानच्या केई निशिकोरीचे आव्हान मोडावे लागेल, तर नदाल अमेरिकेच्या सॅम क्वेरीविरुद्ध खेळेल.

उपांत्य फेरीतील विजेत्या खेळाडूला अंतिम लढतीत गत चॅम्पियन नोव्हाक जोकोव्हिचच्या आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. निशिकोरीविरुद्ध फेडररची कामगिरी ७-३ अशी आहे. सातव्या मानांकित निशिकोरीने गेल्या वर्षी एटीपी फायनल्समध्ये फेडररला नमवले होते.दुसरीकडे नदालची जागतिक क्रमवारीत ६५ व्या स्थानी असलेल्या क्वेरीविरुद्धची कामगिरी ४-१ अशी आहे. क्वेरीने २०१७ मध्ये जागतिक क्रमवारीत तत्कालीन अव्वल खेळाडू अँडी मरेचा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली होती, पण अंतिम चारच्या लढतीत तो मारिन सिलिचविरुद्ध पराभूत झाला होता.

अमेरिकेची दिग्गज सेरेना विलियम्सने उपांत्य फेरी गाठताना आपल्याच देशाच्या एलिसन रिस्केचे कडवे आव्हान ६-४, ४-६, ६-३ असे परतावले. दुसरीकडे रुमानियाच्या सातव्या मानांकीत सिमोना हालेपनेही उपांत्य फेरी गाठताना चीनच्या शुआइ झँग हिच्याविरुद्ध ७-६(७-४), ६-१ अशी बाजी मारली. (वृत्तसंस्था)