शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

राफेल नदालने आणखी दोन स्पर्धा जिंकल्या आहेत 11 वेळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 2:08 PM

स्पेनच्या राफेल नदालने पटकावलेल्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या 11 व्या विजेतेपदाच्या विक्रमाची सर्वत्र चर्चा आहे. निश्चितपणे हा असाधारण विक्रम आहे.

- ललित झांबरे

स्पेनच्या राफेल नदालने पटकावलेल्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या 11 व्या विजेतेपदाच्या विक्रमाची सर्वत्र चर्चा आहे. निश्चितपणे हा असाधारण विक्रम आहे. मात्र नंबर वन नदालने तब्बल 11 वेळा जिंकलेली ही काही एकच स्पर्धा नाही तर आणखी दोन स्पर्धा त्याने 11-11 वेळा जिंकल्या आहेत. फ्रेंच ओपनप्रमाणेच बार्सिलोना ओपन आणि माँटे कार्लो ओपन स्पर्धेच्या अजिंक्यपदावर 11 वेळा त्याने आपल्या नावाची मोहर उमटवली आहे. याप्रकारे एक-दोन नाही तर तब्बल तीन स्पर्धा प्रत्येकी 11 वेळा जिंकणारा टेनिस इतिहासातील तो एकमेव खेळाडू आहे. योगायोगाने या तिन्ही स्पर्धा क्ले कोर्टवरच्या असल्याने 'क्ले कोर्टचा बादशहा' आपल्याशिवाय दुसरा कुणी असूच शकत नाही हे त्याने सिद्ध केले आहे. 

 या तिन्ही स्पर्धांठिकाणी योगायोगाने त्याची ही अजिंक्यपदाची मालिका एकाच वर्षी म्हणजे 2005 पासून सुरु झाली आणि गेल्यावर्षी त्याने या तिन्ही स्पर्धांच्या अजिंक्यपदांचे दशक पूर्ण केले तर यंदा 11 व्यांदा विजेतेपदाचा मान मिळवला. 

यंदा बार्सिलोना ओपनच्या अंतिम फेरीत त्याने ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सीपासला 6-2,6-1 अशी मात दिली. त्यानंतर माँटे कार्लो ओपनच्या विजेतेपदाच्या लढतीत जपानच्या केई निशीकोरीवर तो 6-3, 6-2 असा सरस ठरला आणि रविवारी रोलँड गॕरोसवर ११व्यांदा विजेतेपदाचा चषक उंचावताना त्याने अॉस्ट्रियाच्या डॉमिनीक थिएमचा सरळ सेटमध्ये 6-4, 6-3, 6-2 असा धुव्वा उडवला. 2005ते 08, 2011 व 2012 आणि 2017 व 2018या आठ वर्षी  त्याने बार्सिलोना, माँटे कार्लो आणि फ्रेंच ओपन या तिन्ही स्पर्धा जिंकल्या. या काळात 2015 हे एकमेव असे वर्ष ठरले ज्यात त्याने या तीनपैकी एकही स्पर्धा जिंकली नाही. 

नदालची प्रत्येकी 11 अजिंक्यपदं

फ्रेंच            माँटे कार्लो        बार्सिलोनाओपन        ओपन              ओपन

२००५            २००५            २००५२००६            २००६            २००६२००७            २००७            २००७२००८            २००८            २००८    -               २००९            २००९२०१०            २०१०                -२०११            २०११            २०११२०१२            २०१२            २०१२२०१३                -               २०१३२०१४                -                   --                     २०१६           २०१६२०१७             २०१७           २०१७२०१८             २०१८           २०१८