शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

ना उम्र की सीमा हो...! ३६ व्या वर्षातही रॉजर फेडरर नंबर वन स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 1:13 AM

नुकताच आॅस्ट्रेलियन ओपनचा किताब पटकाविणा-या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने युवा खेळाडूंनाही लाजवेल, असे यश मिळवले होते. या यशाचा आनंद अजूनही संपलेला नाही. फेडररने पुन्हा कमाल केली. त्याच्यासाठी वय हे केवळ आकडे आहेत.

रोटरडम : नुकताच आॅस्ट्रेलियन ओपनचा किताब पटकाविणा-या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने युवा खेळाडूंनाही लाजवेल, असे यश मिळवले होते. या यशाचा आनंद अजूनही संपलेला नाही. फेडररने पुन्हा कमाल केली. त्याच्यासाठी वय हे केवळ आकडे आहेत. या आकड्यांवर मात करीत त्याने यशोशिखर गाठले. ३६ व्या वर्षात एटीपी मानांकनात सर्वाेच्च स्थान पटकाविण्याची किमया फेडररने साधली.यशाचे शिखर गाठण्यासाठी वयाचे बंधन नसते, हे सिद्ध करून दाखवत तो पुन्हा एकदा जगात पहिल्या क्रमांकाचा टेनिसपटू बनला. रोटरडम ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठल्यानंतर फेडररने हा विक्रम रचला. तो नंबर वन स्थान मिळवणारा सर्वात वयोवृद्ध असा खेळाडू ठरला.फेडररने उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात नेदरलॅँडच्या टॉमी हास याचा ४-६, ६-१, ६-१ ने पराभव केला. त्याला पहिला क्रमांक मिळविण्यासाठी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. त्यात तो यशस्वी झाला. आता त्याने स्पेनच्या राफेल नदालची जागा काबीज केली. तोसद्धा ३६ वर्षे आणि १९५ दिवसांचा आहे. त्याने आंद्रे अगासी याचा विक्रम मोडला. अगासी हा २००३ मध्ये ३३ वर्षे आणि १३१ दिवस असा वयाने सर्वात मोठा खेळाडू होता.फेडरर म्हणाला, पुन्हा एकदा नंबर वन होणे हे माझ्या खेळाबाबत खूप काही सांगून जाते. वास्तवात मी कधीही विचार केला नव्हता, की मी या वयात नंबर वन स्थानावर पोहोचेन. माझ्या कारकिर्दीतील हा महत्त्वपूर्ण क्षण आहे. मी याचा आनंद घेत आहे.2012 मध्ये फेडरर नंबर वन स्थानावर होता. अशा प्रकारे तो पाच वर्षे आणि १०६ दिवसांनंतर पुन्हा नंबर वनवर पोहोचला आहे. जो एक विक्रमच आहे. अगासी याने १९९६ नंतर १९९९ मध्ये म्हणजे ३ वर्षे आणि १४२ दिवसांनंतर नंबर वनचा किताब मिळवला होता. गेल्या महिन्यात फेडररने आॅस्ट्रेलियन ओपनच्या रूपात २० वे ग्रॅण्डस्लॅम पटकाविले आहे. तोसुद्धा ऐतिहासिक विक्रम आहे.अगासीचे ट्विटफेडररला खूप खूप शुभेच्छा. ३६ वर्षे १९५ दिवस. रॉजर फेडरर खेळाचा स्तर उंचावत आहे. पुन्हा एक उल्लेखनीय यश.

 

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडरर