नदाल, फेडरर एकत्र निवडणूक लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 06:28 IST2019-08-10T01:30:59+5:302019-08-10T06:28:41+5:30
एटीपी खेळाडूंच्या परिषदेची निवडणूक एकत्र लढवणार

नदाल, फेडरर एकत्र निवडणूक लढवणार
मॉन्ट्रियल : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील खेळाडू राफेल नदालने म्हटले की, तो व त्याचा परंपरागत प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर एटीपी खेळाडूंच्या परिषदेची निवडणूक एकत्र लढवणार आहेत.
१८ वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन स्पेनच्या ३३ वर्षीय नदालने अर्जेंटिनाच्या गुइडो पेल्लाचा ६-३, ६-४ ने पराभव करीत एटीपी मॉन्ट्रियल मास्टर्समध्ये आगेकूच केली. फेडरर व नदाल यांची सहकारी खेळाडूंनी निवड केली. रॉबिन हासे, जैमी मर्रे आणि सर्जेई स्टाखोवस्की यांनी राजीनामा दिल्यानंतर परिषदेतील स्थान रिक्त झाले आहेत. नदाल म्हणाला,‘आम्ही एकत्र जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो एकटा राहणार नाही आणि मीही एकटा पडणार नाही. आम्ही खेळाच्या विकासासाठी एकत्र कार्य करू. ’ (वृत्तसंस्था)