शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

दिग्गज रॉजर फेडररचा तुफानी विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 4:19 AM

एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतील ‘हायव्होल्टेज’ सामन्यात रॉजर फेडररने विम्बल्डन अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढत नोव्हाक जोकोविचला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.

लंडन : संपूर्ण टेनिसविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतील ‘हायव्होल्टेज’ सामन्यात रॉजर फेडररने विम्बल्डन अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढत नोव्हाक जोकोविचला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. या शानदार विजयासह फेडररने एटीपी फायनल्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.‘ओ टू’ अरेना स्टेडियममध्ये झालेल्या या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंना उपांत्य फेरीसाठी विजय आवश्यक होता. यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोकोविचने फेडररला पाच तास रंगलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात नमविले होते. त्यामुळे जोकोविचचे पारडे या सामन्यात वरचढ होते. मात्र वेगळाच निर्धार केलेल्या फेडररच्या चपळ खेळापुढे जोकोविचचा काहीच निभाव लागला नाही. सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना फेडररने जोकोविचचा ६-४, ६-३ असा धुव्वा उडवला. पहिल्या सेटमध्ये फेडररला जोकोविचकडून तुल्यबळ लढत मिळाली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये फेडररचा खेळ जबरदस्त होता. त्याने या वेळी सलग तीन सेट जिंकत बाजी मारली आणि जोकोविचचे आव्हानही संपुष्टात आणले.या पराभवासह जोकोविचचे पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले. या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यात जोकोविचला यश आले असते तर तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आला असता. त्याचप्रमाणे जोकोने या वेळी फेडररच्या सर्वाधिक सहा एटीपी फायनल्स जेतेपदांच्या विश्वविक्रमाची बरोबरीही केली असती. दुसरीकडे, अत्यंत रोमांचक सामन्यात स्पेनच्या दिग्गज राफेल नदालने ग्रीसच्या स्टेफानोस सिटसिपासचा ६-७, ६-४, ७-५ असा पराभव केला.फेडररने एटीपी फायनल्स स्पर्धेत विक्रमी १७व्यांदा सहभाग घेतला असून त्याने १६व्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. बियॉर्न बॉर्ग गटातील पहिल्या लढतीत डॉमनिक थिएमकडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागल्यानंतर फेडररने आपला उच्च दर्जाचा खेळ सादर करत सलग दोन विजयांसह उपांत्य फेरी गाठली. जोकोविचलाही याआधी धक्का देत थिएम या स्पर्धेत जायंट किलर ठरला होता.उपांत्य सामन्यात फेडरर आंद्रे आगासी गटातील अव्वल खेळाडूविरुद्ध भिडेल. आगासी गटातून स्टेफानोस सिटसिपास याने आधीच उपांत्य फेरी गाठली असून दुसºया स्थानासाठी राफेल नदाल, गतविजेता अलेक्झांडर झ्वेरेव आणि डेनिल मेदवेदेव यांच्यात चुरस आहे.

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडरर