फ्रेंच ओपन: थिएम अंतिम फेरीत, उपांत्य लढतीत सेचिनातोवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:51 IST2018-06-09T01:51:34+5:302018-06-09T01:51:34+5:30
सातव्या मानांकित डोमिनिक थिएमने उपांत्य फेरीत मार्को सेचिनातोचा ७-५, ७-६, ६-१ ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

फ्रेंच ओपन: थिएम अंतिम फेरीत, उपांत्य लढतीत सेचिनातोवर मात
पॅरिस : सातव्या मानांकित डोमिनिक थिएमने उपांत्य फेरीत मार्को सेचिनातोचा ७-५, ७-६, ६-१ ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता जेतेपदासाठी थिएम जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू आणि १० वेळचा फ्रेंच चॅम्पियन राफेल नदाल आणि अर्जेंटिनाचा जुआन मार्टिन डेल पोत्रो यांच्यातील विजेत्या खेळाडूविरुद्ध लढेल.
जागतिक क्रमवारीत ७२ व्या स्थानावर असलेल्या सेचिनातोने तीन मानांकित खेळाडूंचा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली होती. त्यात १२ वेळा ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचचाही समावेश होता. त्यामुळे थिएमपुढे आगेकूच करण्यासाठी कडवे आव्हान होते. थिएमने उपांत्यपूर्व फेरीत दुसºया मानांकित अलेक्जेंडर झ्वेरेवला नमविले होता. थिएमने पहिल्याच गेममध्ये सेचिनातोची सर्व्हिस भेदली. सहाव्या गेमपर्यंत थिएमच्या सर्व्हिसवर सेचिनातोला केवळ एक गुण मिळवता आला. त्याने आठव्या गेममध्ये सर्व्हिस भेदताना स्कोअर ५-४ असा केला. थिएमने त्यानंतर तीन गेम जिंकत पहिला सेट पटकावला.
दुसºया सेटममध्ये सेचिनातोने मॅरेथॉन टायब्रेक खेळला. त्याने तीन सेट पॉर्इंट मिळवल्यानंतरही १२-१० ने टायब्रेक गमावला. हा सेट ६१ मिनिट रंगला, पण तिसºया सेटममध्ये थिएमने त्याला कुठली संधी दिली नाही. या पराभवानंतरही सेचिनातोला ६५८००० डॉलर्स मिळाले आणि पुढील आठवड्यात तो रँकिंगमध्ये अव्वल ३० मध्ये दाखल होईल.