French Open; Djerrev, Dale Petro in second round | फ्रेंच ओपन; झ्वेरेव, डेल पेट्रो दुसऱ्या फेरीत

फ्रेंच ओपन; झ्वेरेव, डेल पेट्रो दुसऱ्या फेरीत

पॅरिस : जर्मनीच्या पाचव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याने मंगळवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅन याला पराभूत केले. त्याच बरोबर डेल पेट्रो व महिला गटात व्हिक्टोरिया अजारेंका यांनीही दुसरी फेरी गाठली.
बावीस वर्षाच्या झ्वेरेव याने चार तास रंगलेल्या सामन्यात मिलमॅन याला ७-६, ६-३,२-६, ६-७, ६-३ असे पराभूत केले. झ्वेरेव याला दुसºया फेरीत स्विडनच्या मिखाईल रेमेर यांच्याशी लढावे लागणार आहे. दुसºया सामन्यात चिलीच्या निकोलस जॅरीने जुआन मार्टिन डेल पेट्रो याला चांगलीच लढत दिली. त्याने पहिला सेट ६-३ असा जिंकला मात्र, त्यानंतर पेट्रोने त्याला कोणतही संधी दिली नाही. पेट्रोने हा सामना ३-६, ६-२, ६-१, ६-४ असा जिंकला.
पहिल्या फेरीतील अन्य सामन्यांमध्ये इटलीच्या नवव्या मानांकित फॅबियो फोगनिनी याने आपल्याच देशाच्या अ‍ॅँड्रियास सेप्पी याला ६-३, ६-०, ३-६, ६-३ असे पराभूत केले. स्पेनच्या १८ व्या मानांकित रॉबर्टाे बातिस्ता अगुट याने अमेरिकेच्या स्टिव्ह जॉन्सनला ६-३, ६-४, ६-२ असे पराभूत केले. सर्बियाच्या दुसान लजोविचने ब्राझीलच्या थिएगो मौरा मोंटेरो याला ६-३, ६-४, ६-४ असे पराभूत केले. फ्रिट्ज याने आॅस्ट्रेलियाच्या बेर्नाड टोमिच याला ६-१, ६-४, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभूत केले.
महिलांच्या गटात दोन वेळच्या ग्रॅँडस्लॅम विजेती माजी अव्वल खेळाडू व्हिक्टोरिया अजारेंका हिने २०१७ची विजेती येलेना ओस्टापेंको हिला ६-४, ७-६ असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जपानच्या नाओमी ओसाका हिला पहिल्या फेरीत स्लोवाकियाच्या अ‍ॅना कॅरोलिनाविरुद्ध ०-६, ७-६(७-४), ६-१ असा झुंजार विजय मिळवावा लागला. (वृत्तसंस्था)

Web Title: French Open; Djerrev, Dale Petro in second round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.