शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

डेव्हिस कप : लिएंडर पेसच्या विश्वविक्रमी कामगिरीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 1:56 AM

भारतीय टेनिस संघ नव्या स्वरुपातील डेव्हिस चषक सामन्यासाठी सज्ज झाला असून शुक्रवारी रंगणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीयांनी चीनविरुद्ध कंबर कसली आहे. विशेष म्हणजे ओशियाना गटातील या सामन्यावर सा-या टेनिसविश्वाचे लक्ष असेल.

तियानजिन - भारतीय टेनिस संघ नव्या स्वरुपातील डेव्हिस चषक सामन्यासाठी सज्ज झाला असून शुक्रवारी रंगणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीयांनी चीनविरुद्ध कंबर कसली आहे. विशेष म्हणजे ओशियाना गटातील या सामन्यावर सा-या टेनिसविश्वाचे लक्ष असेल. कारण, भारताचा दिग्गज खेळाडू लिएंडर पेस याने दुहेरी सामन्यात विजय मिळवल्यास स्पर्धा इतिहास सर्वाधिक दुहेरी सामने जिंकणारा खेळाडू असा विश्वविक्रम पेसच्या नावावर होईल.४४ वर्षीय पेसने डेव्हिस चषक स्पर्धेत आतापर्यंत एकूण ४२ सामने जिंकले आहेत. इटलीचा निकोला पीट्रांजेली यानेही ४२ सामने जिंकले असून हा विक्रम मोडण्यासाठी पेसला केवळ एका विजयाची गरज आहे. याआधी फेब्रुवारी २०१७ मध्येही पुण्यात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पेसला हा विक्रम रचण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्यावेळी भारतीय संघाने केवळ पुरुष दुहेरीचा सामनाच गमावला होता. त्याचप्रमाणे, उझबेकिस्तानविरुद्ध बंगळुरु येथे झालेल्या सामन्यात कर्णधार महेश भूपतीने पेसला संघाबाहेर ठेवताना श्रीराम बालाजी व रोहन बोपन्ना यांना खेळविले होते.या दोन सामन्यांतून पेसला घरच्या मैदानावर विश्वविक्रम नोंदवण्याची संधी मिळाली होती. मात्र, आता संघात पुनरागमन केल्यानंतर आणि गेल्या काही सामन्यात चमकदार खेळ केल्यानंतर विदेशामध्ये पेसला हा विक्रम नोंदवण्याची संधी मिळाली आहे. त्याचवेळी, भारतीय संघाला अव्वल एकेरी खेळाडू युकी भांबरीची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवेल. तो दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी रामकुमार रामनाथन खेळेल. दोन दिवसांच्या या लढतीमध्ये बेस्ट आॅफ फाईव्हच्या ऐवजी बेस्ट आॅफ थ्री सामने खेळवले जातील.कागदावर भारतीय संघ चीनविरुद्ध नक्कीच मजबूत दिसत आहे. भारताच्या रामकुमार (१३२) आणि सुमित नागल (२१३) यांचे जागतिक मानांकन त्यांचे प्रतिस्पर्धी अनुक्रमे झी झांग (२४७) आणि दी वू (२४८) यांच्याहून खूप सरस आहे. त्याचवेळी चीनचा शानदार युवा खेळाडू यिबिंग वू याच्या खेळाकडे विशेष लक्ष असेल. सध्या तो जागतिक ज्यूनिअर क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. यिबिंग सलामीला रामकुमारविरुद्ध खेळेल. यानंत सुमितचा सामना झांगविरुद्ध होईल. शनिवारी पेस - बोपन्ना या अनुभवी जोडीचा सामना दी वू आणि माओ शिन गोंग यांच्याविरुद्ध होईल. या सामन्यानंतर परतीचे एकेरी सामने रंगतील. (वृत्तसंस्था)आम्हाला युकीची कमतरता नक्कीच भासेल. त्यानेगेल्या महिन्यात शानदार कामगिरी केली असून तो सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. दुहेरीत मी आणि रोहन मिळून चांगली सांघिक कामगिरी करतो. त्याची ताकद आणि माझे नियंत्रण, त्याची सर्विस आणि माझा नेटजवळचा खेळअसे मिश्रण चांगले रंगते. मला रोहनसह खेळण्यातआनंद होईल. - लिएंडर पेससामन्याची सुरुवात रामकुमार करणार हे भारतासाठी चांगले ठरेल. त्याच्याकडे खूप अनुभव असून त्यालाचांगला खेळ सादर करावा लागेल. या सामन्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती असून जे खेळाडू मानसिकरीत्या मजबूत असतील त्यांना फायदा होईल. येथे खूप थंडी आहे.- महेश भूपती, भारतीय कर्णधार 

टॅग्स :Leander Paesलिएंडर पेसSportsक्रीडा