सिनसिनाटी मास्टर्स टेनिस :हालेपचे लक्ष नंबर वनकडे, कार्गियोस अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 18:46 IST2017-08-20T18:46:23+5:302017-08-20T18:46:27+5:30

Cincinnati Masters Tennis: Hallelaw's number one spot, in the Cargius final | सिनसिनाटी मास्टर्स टेनिस :हालेपचे लक्ष नंबर वनकडे, कार्गियोस अंतिम फेरीत

सिनसिनाटी मास्टर्स टेनिस :हालेपचे लक्ष नंबर वनकडे, कार्गियोस अंतिम फेरीत


सिनसिनाटी, दि. 20 - रोमानियाच्या सिमोना हालेपने स्लोएन स्टिफन्सचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून एटीपी सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. विजेतेपदाच्या लढतीत जर सिमोनाने गर्बाइन मुगुरुजाचा पराभव केला, तर तिला या सत्रात तिस-यांदा जागतिक क्रमवारीत नंबर होण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे पुरुषांच्या एकेरीत आॅस्ट्रेलियाच्या निक किर्गियोसने स्पेनच्या डेव्हिड फेररचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
महिलांच्या एकेरीत जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या सिमोनाने स्लोएन स्टिफन्सला ६-२, ६-१ गुणांनी नमविले. अंतिम फेरीत तिची गाठ विम्बल्डन विजेती गर्बाइन मुगुरुजाविरुद्ध होईल. मुगुरुजाने उपांत्य फेरीत झेक गणराज्यची कॅरोलिना प्लिसकोव्हाला ६-३, ६-२ असे नमविले.
पुरुषांच्या एकेरीत आॅस्ट्रेलियाचा जागतिक क्रमवारीत २३ व्या क्रमांकावर असलेल्या निक किर्गियोसने स्पेनच्या डेव्हिड फेररला ७-६ (७-३), ७-६ (७-४) गुणांनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. विजेतेपदासाठी त्याचा सामना बुल्गेरियाचा जागतिक क्रमवारीत ११ व्या क्रमांकावर असलेल्या ग्रिगोर दिमित्रीव्हविरुद्ध होईल. दिमित्रीव्हने उपांत्यफेरीत अमेरीकेच्या जॉन इसनरला ७-६ (७-४), ७-६ (१२-१०) गुणांनी नमविले.

Web Title: Cincinnati Masters Tennis: Hallelaw's number one spot, in the Cargius final