दिग्गज टेनिसपटू बोरिस बेकर विकणार सर्व ट्रॉफी अन् मेडल्स; कारण ऐकून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 11:50 AM2019-06-24T11:50:43+5:302019-06-24T11:51:08+5:30

जर्मनी : विब्लडन स्पर्धेच्यात इतिहासातील सर्वात युवा विजेत्याचा मान मिळवणारे दिग्गज टेनिसपटू बोरिस बेकर यांनी त्यांच्या सर्व ट्रॉफी व ...

Bankrupt champion: German tennis star Boris Becker auctions trophies to pay off debts | दिग्गज टेनिसपटू बोरिस बेकर विकणार सर्व ट्रॉफी अन् मेडल्स; कारण ऐकून व्हाल थक्क!

दिग्गज टेनिसपटू बोरिस बेकर विकणार सर्व ट्रॉफी अन् मेडल्स; कारण ऐकून व्हाल थक्क!

Next

जर्मनी : विब्लडन स्पर्धेच्यात इतिहासातील सर्वात युवा विजेत्याचा मान मिळवणारे दिग्गज टेनिसपटू बोरिस बेकर यांनी त्यांच्या सर्व ट्रॉफी व मेडल्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळखोरीतून बाहेर पडण्यासाठी बेकर यांना हे पाऊल उचलावे लागले आहे. 


वयाची 17 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच बेकर यांनी सहा प्रमुख स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावली होती. त्यांनी एकूण सहा ( ऑस्ट्रेलिया ओपन - 1991 व 1996, विम्बल्डन - 1985, 1986 व 1989, अमेरिकन ओपन - 1989) ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. याशिवाय पदकं, चषक, घड्याळ व फोटोग्राफ अशा मिळून 82 वस्तू लिलावात ठेवण्यात येणार आहेत. 2017मध्ये बेकर यांना दिवाळखोर म्हणून जाहीर करण्यात आले. जून 2018मध्ये त्यांनी ट्रॉफीचा लिलाव करण्याचे ठरवले होते, परंतु अखेरच्या क्षणी त्यालाही स्थगिती देण्यात आली.  

Web Title: Bankrupt champion: German tennis star Boris Becker auctions trophies to pay off debts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.