अॉस्ट्रेलियन ओपन टेनिस : जोकोविच, स्टॅनिलास वावरिंकाची आगेकूच; क्विटोव्हाला पराभवाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 14:47 IST2018-01-16T14:46:58+5:302018-01-16T14:47:14+5:30

दुखापतीतून सावरल्यावर दीर्घकाळानंतर पुनरागमन करणाऱ्या नोव्हाक जोकोवीच आणि स्टॅनिलास वावरिंका यांनी अपेक्षेप्रमाणे अॉस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत धडाक्यात सुरुवात केली.

Australian Open Tennis: Djokovic, Stalinas Wavirinka; Quitwala's push of defeat | अॉस्ट्रेलियन ओपन टेनिस : जोकोविच, स्टॅनिलास वावरिंकाची आगेकूच; क्विटोव्हाला पराभवाचा धक्का

अॉस्ट्रेलियन ओपन टेनिस : जोकोविच, स्टॅनिलास वावरिंकाची आगेकूच; क्विटोव्हाला पराभवाचा धक्का

मेलबोर्न- दुखापतीतून सावरल्यावर दीर्घकाळानंतर पुनरागमन करणाऱ्या नोव्हाक जोकोवीच आणि स्टॅनिलास वावरिंका यांनी अपेक्षेप्रमाणे अॉस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत धडाक्यात सुरुवात केली. जोकोवीचने आपला पहिला सामना ६-१, ६-२, ६-४ असा सहज जिंकला. अमेरिकेच्या डोनाल्ड यंगवरील या विजयानंतर जोकोवीच म्हणाला की महिनाभरापूर्वी मी अॉस्ट्रेलियन ओपन खेळेल की नाही याबद्दल अनिश्चित होतो पण पुन्हा कोर्टवर उतरल्याचा आनंदच वेगळा आहे. 

स्वित्झर्लंडच्या स्टॅनिलास वावरिंकाने बेरांकिसवर ६-३, ६-४, २-६, ७-६ असा विजय मिळवला.  दुसऱ्या दिवशीच्या धक्कादायक निकालात महिला एकेरीची 27 वी मानांकित पेट्रा क्विटोव्हा हिचे आव्हान संपले. आंद्रिया पेट्कोव्हिकने अखेरचे तीन गेम जिंकत तिला 6-3, 4-6, 10-8 अशी मात दिली.

Web Title: Australian Open Tennis: Djokovic, Stalinas Wavirinka; Quitwala's push of defeat

टॅग्स :Sportsक्रीडा