शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

Australian Open: सेरेना विलियम्स, थीम यांची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 5:24 AM

Australian Open: सेरेनाने एक गेमने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करीत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सलग १० गेम जिंकत लॉरा सिजमुंडचा ६-१, ६-१ ने पराभव केला.

मेलबोर्न : सेरेना विलियम्सने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सोमवारी एकतर्फी विजय नोंदवला. सेरेनाने एक गेमने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करीत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सलग १० गेम जिंकत लॉरा सिजमुंडचा ६-१, ६-१ ने पराभव केला. सेरेना विक्रमी २४ वे महिला एकेरी ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी उत्सुक आहे. सेरेनाने या लढतीत आपल्या सर्व्हिसवर केवळ ९ गुण गमावले आणि १६ विनर लगावले.व्हीनस विलियम्सने २०१९ नंतर प्रथमच ग्रँडस्लॅम सामना जिंकला. तिने २१व्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळताना कर्स्टन फिलिपकेन्सचा ७-५, ६-२ ने पराभव केला. ४० वर्षीय व्हीनस यंदाच्या ड्रॉमध्ये सर्वांत जास्त वय असलेली खेळाडू आहे. ४० वर्षांवरील वयाच्या आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी झालेल्या सहा खेळाडूंच्या पंक्तीत तिने स्थान मिळवले. तीन वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन नाओमी ओसाकाने अनास्तासिया पावल्युचेनकोव्हाला ६-१, ६-२ असे नमवले. कोरोना महामारीमुळे पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचे आयोजन तीन आठवडे विलंबाने होत आहे. जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानावरील खेळाडू व तीन वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन एंजेलिक कर्बरला मात्र अमेरिकेच्या बर्नाडा पेराविरुद्ध ६-०, ६-४ ने पराभव स्वीकारावा लागला.पुरुष एकेरीत अमेरिकन ओपन चॅम्पियन डोमिनिक थीमने पिछाडीवर पडल्यानंतर अनुभवी मिखाइल कुकुशकिनचा ७-६, ६-२, ६-३ ने पराभव केला. सहाव्या क्रमांकाच्या अलेक्जेंडर ज्वेरवने पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करत मार्कोस गिरोनचा ६-७, ७-६, ६-३, ६-२ ने पराभव केला.मिलोस राओनिकने फेडेरिको कोरियाचा ६-३, ६-३, ६-२ ने पराभव केला. याव्यतिरिक्त माजी चॅम्पियन स्टेन वावरिंका, फ्रांसिस टियाफोई व टेलर फ्रिट्ज यांनीही विजयी सलामी दिली. गेल मोनफिल्सला मॅराथॉन लढतीत एमिल रुसुवोरीविरुद्ध ३-६, ६-४, ७-५, ३-६, ६-३ असा पराभव स्वीकारावा लागला.ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आठ वेळा जेतेपद पटकावणाऱ्या जोकोविचने जेरेमी चार्डीचा ६-३, ६-१, ६-२ ने पराभव करीत विजयी सुरुवात केली.  त्याने सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या उपस्थितीवर खुशी व्यक्त करताना म्हटले की, ‘स्टेडियममध्ये पुन्हा प्रेक्षकांना बघून आनंद झाला. गेल्या १२ महिन्यांत येथे मी सर्वाधिक प्रेक्षक बघितले. मी तुमच्या समर्थनासाठी आभारी आहे.’

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनserena williamsसेरेना विल्यम्स