शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस : भारताच्या रामकुमार, भांब्रीचे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 1:16 AM

भारताच्या युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांना अनुक्रमे फ्रान्सचा पिएरे ह्युजूस हर्बर्ट व मारिन सिलीचकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचे एकेरी गटात एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत दुस-या फेरीत आव्हान संपुष्टात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारताच्या युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांना अनुक्रमे फ्रान्सचा पिएरे ह्युजूस हर्बर्ट व मारिन सिलीचकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचे एकेरी गटात एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत दुस-या फेरीत आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे नेदरलँडच्या रॉबिन हासी, फ्रान्सच्या बेनॉट पैरे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.महाराष्ट्र टेनिस संघटनेच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत दुस-या फेरीत जागतिक क्रमवारीत ८१ व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या पिएरे ह्युजूस हर्बर्टने जागतिक क्रमवारीत ११८ व्या स्थानावर असलेल्या भारताच्या युकी भांब्रीचा १ तास ५० मिनिटे चाललेल्या लढतीत ६-४, ३-६, ४-६ तीन सेटमध्ये पराभव करून दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. चुरशीच्या झालेल्या या लढतीत युकीने पहिल्याच गेममध्ये पिएरेची सर्व्हिस रोखली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापली सर्व्हिस राखत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. दहाव्या गेममध्ये युकीने ४०-४० असे गुण झाले असताना दोन अफलातून फटके परतावून लावत हा सेट ६-४ असा जिंकून आघाडी घेतली. दुसºया सेटमध्ये पिएरेने अधिक आक्रमक सुरुवात केली. या सेटमध्ये पिएरेने युकीची दुसºया व चौथ्या गेममध्ये, तर युकीने पिएरेची पहिल्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली. पण सामन्यात ५-३ अशा फरकाने आघाडीवर असताना ९ व्या गेममध्ये पिएरेने बिनतोड सर्व्हिस करत हा सेट युकीविरुद्ध ६-३ असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम ठेवले. तिसºया व निर्णायक सेटमध्ये पिएरेने वेगवान व चतुराईने खेळ केला. या सेटमध्ये आपले वर्चस्व कायम राखत हा सेट युकीविरुद्ध ६-४ अशा फरकाने जिंकून विजय मिळवला. भारताच्या रामकुमार रामनाथनला यूएस ओपन आणि २0१७ मध्ये विम्बल्डन स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचणाºया मारिन सिरीचकडून ४-६, ३-६ गुणांनी पराभव पत्करावा लागला.जागतिक क्रमवारीत ४२ व्या स्थानावर असलेल्या नेदरलँडच्या रॉबिन हासी याने जागतिक क्रमवारीत ११३ व्या स्थानावर असलेल्या चिलीच्या निकोलस जेरीचा टायब्रेकमध्ये ३-६, ७-६ (५), ७-५ असा पराभव करून आगेकूच केली. हा सामना २ तास १० मिनिटे चालला. जागतिक क्र. ४१ असलेल्या फ्रान्सच्या बेनॉट पैरे याने जागतिक क्र. ८५ असलेल्या हंगेरीच्या मार्टन फॉक्सोविक्स याचा ६-४, ६-७ (४), ७-६ (६) सेटनी ३ तास २ मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली.पहिल्या सेटमध्ये मला हवी तशी सर्व्हिस करता आली नाही, कारण मला सूर गवसला नव्हता. हुकमी सर्व्हिस हे माझे प्रमुख अस्त्र आहे. परंतु तेच निष्प्रभ ठरल्यामुळे पहिला सेट युकीला जिंकता आला. परंतु सर्व्हिस हेच माझं गुण मिळविण्याचे मुख्य साधन असल्यामुळे मी त्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आणि दुसºया सेटमध्ये यश मिळाले. त्यामुळे दुसरा सेट जिंकून सामन्यात मला १-१ अशी बरोबरी साधता आली. तरीही सामना जिंकण्याकरिता आणखी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे हे मला जाणवत होते. त्यामुळे तिसºया सेटमध्ये मी माझी सर्व्हिस राखण्यावर भर दिला. कारण माझी खेळण्याची तीच शैली आहे. त्यातच युकीची सर्व्हिस अत्यंत मोक्याच्या क्षणी भेदण्यात मला यश मिळाले. त्यामुळे मला हा सामना जिंकता आला. युकीने या संपूर्ण सामन्यात चांगली झुंज दिली. त्यामुळे मला सर्वोत्तम खेळ करावा लागला. - पिएरे ह्युजूस हर्बर्ट

निकाल :दुसरी फेरी : एकेरीपिएरे ह्युजूस हर्बर्ट (फ्रांस) (८) वि.वि. युकी भांब्री (भारत) ४-६, ६-3, ६-४; बेनॉट पैरे (फ्रांस) (४) वि.वि. मार्टन फॉक्सोविक्स (हंगेरी) ६-४, ६-७ (४), ७-६ (६); रॉबिन हासी (नेदरलँड) (५) वि.वि. निकोलस जेरी (चिली) ३-६, ७-६ (५), ७-५.

टॅग्स :Sportsक्रीडाMaharashtraमहाराष्ट्र