अलेक्झांडर ज्वेरेव सेमीफायनलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 04:14 IST2018-08-05T04:14:39+5:302018-08-05T04:14:41+5:30

माजी विजेत्या अलेक्झांडर ज्वेरेव याने जपानच्या केई निशिकोरी याचा ३-६, ६-१, ६-४ ने पराभव केला.

Alexander Zverev in the semi-finals | अलेक्झांडर ज्वेरेव सेमीफायनलमध्ये

अलेक्झांडर ज्वेरेव सेमीफायनलमध्ये

वॉशिंग्टन : माजी विजेत्या अलेक्झांडर ज्वेरेव याने जपानच्या केई निशिकोरी याचा ३-६, ६-१, ६-४ ने पराभव केला. याबरोबरच त्याने एटीपी वॉशिंग्टन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तीन वेळा ग्रॅण्डस्लॅम विजेता अ‍ॅँडी मरे याने थकव्याचे कारण पुढे करीत सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
तिसऱ्या स्थानावरील जर्मनीच्या ज्वेरेव याने सातव्या मानांकित आणि २०१५ च्या चॅम्पियन निशिकोरी याचे आव्हान संपुष्टात आणले. आता ज्वेरेव याचा सामना १० व्या मानांकित स्टेफानोस सिटसिपासविरुद्ध होईल.

Web Title: Alexander Zverev in the semi-finals