टेनिसपटूंचे वय पडताळणीसाठी एआयटीएची समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:33 IST2017-11-15T00:32:57+5:302017-11-15T00:33:06+5:30
खेळाडूंचे वय पडताळणीसाठी अ.भा. टेनिस संघटनेने (एआयटीए) तीन सदस्यीत समिती नेमली आहे. पण यासाठी साक्ष जुळविण्याचे काम मात्र तक्रारकर्त्यांना करावे लागेल.

टेनिसपटूंचे वय पडताळणीसाठी एआयटीएची समिती
नवी दिल्ली : खेळाडूंचे वय पडताळणीसाठी अ.भा. टेनिस संघटनेने (एआयटीए) तीन सदस्यीत समिती नेमली आहे. पण यासाठी साक्ष जुळविण्याचे काम मात्र तक्रारकर्त्यांना करावे लागेल.
वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत अधिक वयाचे खेळाडू सहभागी होत असल्याचा आरोप पालक वारंवार करतात. यामुळे पात्र मुलांना स्पर्धेत संधी नाकारली जाते. मागच्या महिन्यात डीएलटीएमध्ये झालेल्या राष्ट्रीय हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेदरम्यान ५० हून अधिक पालकांनी एआयटीएला पत्र लिहून अधिक वयाच्या खेळाडूंविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली होती. यावर एआयटीएच्या कार्यकारी समितीने समिती स्थापन केली. पुनित गुप्ता, पीएफ मोन्टेक आणि विवेक शर्मा यांचा समितीत समावेश आहे.
साक्ष जुळविण्याचे काम तक्रारकर्त्यांवरच का ढकलले असा सवाल करताच एआयटीए महासचिव हिरण्यमय चॅटर्जी म्हणाले, ‘आमच्याकडे वास्तविक तक्रारी याव्यात, यासाठी असे धोरण आखले आहे, अन्यथा पराभूत झालेल्या प्रत्येक खेळाडूचे आई-वडील तक्रार करीत राहतील. ख-या तक्रारीचे निराकरण करण्याची जबाबदारी आमची आहे.’(वृत्तसंस्था)