'मन उडू उडू झालं' मालिकेत दीपू होणार साळगावकारांची मोठी सून, सानिकाचा होणार जळफळाट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 11:07 AM2022-06-15T11:07:07+5:302022-06-15T11:32:42+5:30

Man Udu Udu Jhal : दीपूच्या विरोधात नवी खेळी खेळण्यासाठी सानिका सज्ज झाली आहे. इंद्रा दीपूच्या प्रेमात सानिका मीठाचा खडा टाकणार आहे.

Man udu udu jhal episode update Dipu will be Salgaonkar's eldest daughter in law | 'मन उडू उडू झालं' मालिकेत दीपू होणार साळगावकारांची मोठी सून, सानिकाचा होणार जळफळाट

'मन उडू उडू झालं' मालिकेत दीपू होणार साळगावकारांची मोठी सून, सानिकाचा होणार जळफळाट

googlenewsNext

छोट्या पडद्यावर सुरु असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे मन उडू उडू झालं. या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. दिपूवरचं सकंट आता दूर झालंय. ती मोठ्या अपघातातून बरी झालीय. दीपूला पुन्हा उभी करण्यात इंद्राचा खूप मोठा वाटा आहे. दीपू आणि इंद्राची केमिस्ट्री लोकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत पुन्हा इंद्रा आणि दीपूची लव्हस्टारी सुरु झाली आहे. आजारापणात इंद्राने घेतलेली दीपूची काळजी बघून देशपांडे सरांनी देखील दोघांच्या प्रेमाची जाणीव झाली आहे. पण सानिका दीपू आणि इंद्राच्या लग्नात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात इंद्रा दिपूच्या गाळ्यात लॉकेट घालत लवकरच तिला गळ्यात मंगळसूत्र घालणार असल्याचं सांगतोय तर दुसरीकडे दीपूची मोठी बहीण सानिकाला  'मी दीपूला घराचा उंबरा ओलांडू देणार नसल्याचं' बोलतंय.

सानिका इंद्रा आणि दीपूच्या लग्नाला विरोध करताना दिसतेय. मात्र जयश्री 'तुझी इच्छा असो वा नसो दीपू या घरात मोठी सून म्हणून आणि तुझी मोठी जाऊ म्हणून येणार म्हणजे येणार', अशा शब्दांत जयश्री सानिकाला उत्तर देतेय. हे सगळं घडत असताना तिथं देशपांडे सरही असतात. आता सानिका दीपू विरोधात काय नवं षडयंत्र रचणार?दीपूला त्रास देण्यासाठी सानिका कार्तिक मिळून कोणता प्लान आखणार?, या प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळतील. 

Web Title: Man udu udu jhal episode update Dipu will be Salgaonkar's eldest daughter in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.