झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:50 IST2025-06-13T17:50:05+5:302025-06-13T17:50:15+5:30
फोन्समध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन आणण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. भारतीय कंपन्या यात आघाडीवर आहेत.

झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
भारतात सध्या दर आठवड्याला एकतरी स्मार्टफोन लाँच होत आहे. सध्या फाईव्ह जीचे युग अवतरलेले आहे. यामुळे या फोन्समध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन आणण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. भारतीय कंपन्या यात आघाडीवर आहेत.
भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी लावाने ८००० रुपयांच्या किंमतीत लावा Storm Lite 5G आणला आहे. एवढेच नाही तर Storm Play 5G देखील १०००० रुपयांत आणला आहे. दोन्ही फोनमध्ये 6.75 इंच एचडी डिस्प्ले आणि त्यातही 120 हर्त्ज रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. हे दोन्ही फोन IP64 रेटिंगसह येत आहेत.
प्रोसेसरचे सांगायचे झाले तर मीडियाटेक डाइमेंसिटी 6400 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम देण्यात आली असून ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच पाठीमागे ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, जो सोनी सेन्सर आहे. यासोबतच २ मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा आहे.
लावा स्टॉर्म लाईट ५जी अॅस्ट्रल ब्लू आणि कॉस्मिक टायटॅनियम रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मॉडेलसाठी त्याची किंमत ७९९९ रुपये आहे. लावा स्टॉर्म प्ले ५जीची ६ जीबी + १२८ जीबी मॉडेलसाठी किंमत ९,९९९ रुपये आहे. यामध्ये ३.५ मिमी ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. १८ वॉटचा चार्ज देण्यात येत आहे. दोन्ही फोन ड्युअल सिम सपोर्टसह येतात आणि अँड्रॉइड १५ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात.