काय सांगता? इंटरनेटवर फक्त 140 रूपयात विकलं जातं तुमचं प्रोफाइल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 04:45 PM2019-05-18T16:45:29+5:302019-05-18T16:50:50+5:30

तुम्हाला माहीत आहे का? वर्ल्ड वाइल्ड वेबच्या या जाळ्यामध्ये तुमची प्रोफाइल विक्रीसाठी उपलब्ध आहे. फक्त तुमचीच नाही तर आपल्या सर्वांच्याच फ्रोफाइल्सची विक्री करण्यात येते.

Your profile is on sale for just a few bucks in dark web | काय सांगता? इंटरनेटवर फक्त 140 रूपयात विकलं जातं तुमचं प्रोफाइल

काय सांगता? इंटरनेटवर फक्त 140 रूपयात विकलं जातं तुमचं प्रोफाइल

Next

तुम्हाला माहीत आहे का? वर्ल्ड वाइल्ड वेबच्या या जाळ्यामध्ये तुमची प्रोफाइल विक्रीसाठी उपलब्ध आहे. फक्त तुमचीच नाही तर आपल्या सर्वांच्याच फ्रोफाइल्सची विक्री करण्यात येते. यातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, हा डेटा फक्त हॅकर्स नाही तर अनेक बड्या कंपन्यांसह मार्केट रिसर्चरही खरेदी करत आहेत. तुम्हाला थोडासा तरी अंदाज बांधू शकता का की, तुमच्या डेटाची किंमत काय असेल? नाही ना... तुमचा डेटा या कंपन्यांना प्रतिदिन फक्त 140 रूपयांमध्ये विकण्यात येत आहे. 

'डार्क वेब' नावाच्या या जगामध्ये रेग्युलर ब्राउजर्समार्फत प्रवेश करता येत नाही. अनोळखी कम्युनिकेशनसाठी परवानगी देणाऱ्या टॉरसारख्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर्सचा वापर करावा लागतो. अशा सॉफ्टवेअर्समार्फत डार्क वेब एक्सेस करण्यात येतं. इंटरनेटच्या या लपलेल्या भागामध्ये, हॅकर्स इंटरनेट यूजर्सची माहिती मिळवत असून यामध्ये पासवर्ड, टेलिफोन नंबर्स आणि ई-मेल आयडी यांसारख्या माहितीचा समावेश करण्यात आला आहे. 

3 ग्रुप करत आहेत डेटा सेल 

एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, हा डेटा मिळवण्याऱ्यांमध्ये सायबर अटॅक करणाऱ्या, कंज्यूमर्स बिहेवियर ट्रॅक करणारे आणि व्हिडीओ स्ट्रीमिंग साइट्स फ्रीमध्ये यूज करण्यासाठी एक्सेस मिळवणाऱ्यांचा समावेश असतो. काळजी करण्याची गोष्ट म्हणजे, असा डेटा त्या कंपन्यांकडून खरेदी करण्यात येत आहे. ज्यांना आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या कंज्यूमर बेसची माहिती मिळवायची आहे. या कंपन्या आपल्या विरोधी कंपन्यांच्या मुख्य एग्जिक्युटिव्सनाही ट्रॅक करू इच्छितात. 

हॅकर्सचा एक ग्रुप इनक्रिप्टेड पासवर्ड्ससोबत डेटा लिक करतो तर, दुसरा ग्रुप त्यांना डीक्रिप्ट करतो. नवभरत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आता एक तिसरा ग्रुप आहे, जो या डीक्रिप्टेड पासवर्ड्सची लिस्ट तयार करत असून यांना एका सेंन्ट्रल सर्व्हरवर स्टोअर करत आहे. येथून डेटा ब्रीच होतो आणि हॅकर्ससाठी हा एक कॉमन सोर्स म्हणून काम करतो. 

सिंगल पासवर्डचा वापर करणं सर्वात मोठी कमजोरी

जर तुम्ही आपल्या अनेक अकाउंट्ससाठी एक सिंगल पासवर्ड किंवा थोडा वेगळा पासवर्ड वापरत असाल तर, तुम्ही पासवर्ड लगेच बदलणं गरजेचं आहे. असा अंदाज वर्तव्यात येत आहे की, हॅकर्सनी फक्त लहान वेबसाइटमधूनच 7,000-8,000 डेटाबेस एकत्र केला आहे. यामध्ये मोठ्या साइट्सवरून चोरी करण्यात आलेल्या डाटाचा समावेश करण्यात आलेला नाही.
 
यूजर डेटा वेगवेगळ्या पॅकेजमध्ये विकण्यात येतो. त्यांना एक दिवसासाठी 2 डॉलर (साधारणतः 140 रुपये) आणि 3 महिन्यांसाठी 70 डॉलर (साधारणतः 4,900रुपये)चं पॅकेज देण्यात येतं. ग्राहक क्रिप्टोकरेंसी म्हणजेच, बिटकॉइन, लाइटकॉइन, डॅश, रिपल, ईदरियम आणि जेडकॅशमार्फत हा डेटा खरेदी करू शकतात. 

एक्सपर्ट्सच्या मते, जर एखाद्या हॅकरला एका यूजर मल्टीपल पासवर्ड मिळाला. तर तो त्या प्रोफाइलला काही मनिटांमध्येच विक्रिसाठी उपलब्ध करू शकतो. अनेक यूजर्स नेहमी मल्टीपल अकाउंट्ससाठी एकच पासवर्ड ठेवतात. यावरून त्यांच्या वागण्याचा अंदाज लावला जातो. यूजर डेटा ट्रॅक करणं इंटरनेटवर एखाद्या व्यक्तीच्या अॅक्टिव्हीटी लेव्हलवर अवलंबून असतं. 

Web Title: Your profile is on sale for just a few bucks in dark web

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.