आज वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण
By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST
कोलकाता : २०१५ या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण उद्या शनिवारी लागणार आहे. हे चंद्रग्रहण केवळ ईशान्य भारतात आणि त्यातही अरुणाचल प्रदेशातच दिसणार असल्याने इतर खगोलप्रेमींची मात्र घोर निराशा होणार आहे.
आज वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण
कोलकाता : २०१५ या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण उद्या शनिवारी लागणार आहे. हे चंद्रग्रहण केवळ ईशान्य भारतात आणि त्यातही अरुणाचल प्रदेशातच दिसणार असल्याने इतर खगोलप्रेमींची मात्र घोर निराशा होणार आहे.अरुणाचल प्रदेशच्या तेझू आणि रोईंग येथील लोकांना या खग्रास चंद्रग्रहणाचा पूर्ण आनंद घेता येईल. चंद्रोदयानंतर लगेच ४.४३ मिनिटांपर्यंत हे चंद्रग्रहण पाहता येईल. याशिवाय दिब्रुगड, इम्फाल, कोहिमा आणि पोर्ट ब्लेअर येथेही या चंद्रग्रहण दिसेल. कोलकातासह भारतातील अन्य काही भागांत मात्र आंशिक चंद्रग्रहण पाहता येईल. दुपारी ३.४५ वाजता चंद्रग्रहण लागेल आणि सायंकाळी ५.२७ वाजता ते आपल्या पूर्ण रूपात येईल. हे पूर्ण रूप ५.३२ वाजेपर्यंत कायम राहील आणि त्यानंतर ७.१४ वाजेपर्यंत त्याचे आंशिक रूप दिसेल. (वृत्तसंस्था)