Yamaha चे दोन स्वस्त साऊंडबार लाँच; 120W पर्यंतचा आउटपुट देणारे साऊंडबार वाढवतील पार्टीची शान 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 07:02 PM2021-06-19T19:02:23+5:302021-06-19T19:03:30+5:30

Yamaha Soundbars India: Yamaha कंपनीने भारतात Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A नावाने दोन साऊंडबार मॉडेल भारतात लाँच केले आहेत. 

Yamaha sr c20a sr b20a soundbars launched in india check price and all details  | Yamaha चे दोन स्वस्त साऊंडबार लाँच; 120W पर्यंतचा आउटपुट देणारे साऊंडबार वाढवतील पार्टीची शान 

Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A 2.1 चॅनेल सेटअपसह येतात.

Next

Yamaha कंपनीने भारतात साऊंडबारचे दोन मॉडेल लाँच केले आहेत. Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A नावाने दोन साऊंडबार मॉडेल भारतात लाँच झाले आहेत. Yamaha SR-C20A 100W साऊंड आउटपुट देतो, तर SR-B20A मध्ये 120W साऊंड आउटपुट मिळतो. दोन्ही मॉडेल्समध्ये TV ARC सपोर्टसह एक HDMI आउट पोर्ट, ब्लूटूथ कनेक्टिविटी आणि चार सराऊंड साऊंड मोड देण्यात आले आहेत. वाईट प्रदान करते आहेत. Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A साऊंडबार एका अ‍ॅपच्या माध्यमातून कंट्रोल करता येतील.  

Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A ची किंमत  

Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A या दोन्ही साऊंडबार्सची किंमत 20,490 रुपये आहे. परंतु अमेझॉनवर Yamaha SR-C20A 18,190 रुपयांमध्ये तर Yamaha SR-B20A 19,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. 

Yamaha SR-C20A, Yamaha SR-B20A: स्पेसिफिकेशन आणि फीचर्स 

Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A 2.1 चॅनेल सेटअपसह येतात. SR-C20A मध्ये डाव्या आणि उजव्या चॅनेलसाठी दोन 20W स्पीकरसोबत 60W बिल्ट-इन सबवूफर देण्यात आला आहे. हा सबवूफर 100W चा साऊंड आउटपुट देतो. SR-B20A मध्ये दोन 30W लेफ्ट आणि राईट चॅनेल स्पीकर आहेत आणि 60W चा बिल्ट-इन सबवूफर आहे जो एकूण 120W चा आउटपुट देतो.  

दोन्ही साऊंडबारमध्ये स्टीरियो, स्टॅंडर्ड, मूवी आणि गेम सराउंड साऊंड असे चार मोड देण्यात आले आहेत. हे दोन्ही डिवाइस एका अ‍ॅपच्या माध्यमातून कंट्रोल करता येतात, सोबत एका रिमोट देखील देण्यात आला आहे.  Yamaha SR-C20A चे वजन 1.8kg आहे तर, Yamaha SR-B20A चे वजन 3.2kg आहे. दोन्ही साऊंडबार वॉल माउंटिंग सपोर्टसह येतात. 

Web Title: Yamaha sr c20a sr b20a soundbars launched in india check price and all details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.