Redmi चे दोन स्वस्त आणि मस्त फोन येणार भारतात; 50MP च्या कॅमेऱ्यासह होऊ शकतात लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: December 3, 2021 12:43 PM2021-12-03T12:43:06+5:302021-12-03T12:44:53+5:30

Redmi Phones: Xiaomi आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत Redmi 10 (2022) आणि Redmi 10 Prime (2022) हे दोन फोन भारतात सादर करणार आहे.

Xiaomi Redmi 10 Prime 2022 to launch in india soon specs leaked  | Redmi चे दोन स्वस्त आणि मस्त फोन येणार भारतात; 50MP च्या कॅमेऱ्यासह होऊ शकतात लाँच 

Redmi चे दोन स्वस्त आणि मस्त फोन येणार भारतात; 50MP च्या कॅमेऱ्यासह होऊ शकतात लाँच 

Next

Xiaomi नं गेल्याच आठवड्यात आपला स्वस्त 5G Phone सादर केला आहे. कंपनीनं Redmi ब्रँड अंतर्गत Redmi Note 11T 5G लाँच केला आहे. आता कंपनी 4G स्मार्टफोन्स सादर करण्याची तयारी करत आहे. कंपनी Redmi 10 (2022) आणि Redmi 10 Prime (2022) वर काम करत आहे आणि हे दोन्ही नवीन रेडमी फोन लवकरच भारतीय ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतात.  

टिपस्टर कॅस्परनं Redmi 10 (2022) आणि Redmi 10 Prime (2022) हे दोन फोन भारतात येणार असल्याची माहिती दिली आहे. यातील Redmi 10 (2022) स्मार्टफोनची माहिती गेल्या आठवड्यात लीक झाली होती. Redmi 10 Prime (2022) स्मार्टफोन चीनमध्ये आलेल्या Redmi Note 11 4G फोनचा रीब्रँड व्हर्जन असू शकतो. लीकमधून या दोन्ही फोन्स किंमत समजली नाही परंतु चीनमधील रेडमी नोट 11 ची किंमत पाहता, हे फोन्स 12 हजार रुपयांच्या आसपास सादर केले जाऊ शकतात.  

Redmi 10 (2022) चे स्पेसिफिकेशन्स 

लिक्सनुसार Redmi 10 (2022) स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर असेल. त्याला 8MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2MP च्या थर्ड सेन्सरची जोड देण्यात येईल. मीडिया रिपोर्टनुसार, हा फोन 4GB आणि 6GB रॅम व्हेरिएंटसह बाजारात येईल. तसेच यात 128 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते.  

Redmi 10 Prime (2022) चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Redmi 10 Prime (2022) मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा एलसीडी डिस्प्ले फुलएचडी+ रिजोल्यूशन, 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनला मीडियाटेक हीलियो जी88 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर माली जी52 जीपीयू मिळतो. 6GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेजसह येणारा रेडमी फोन अँड्रॉइड 11 ओएस आधारित मीयुआय 12.5 वर चालतो.   

फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. Redmi 10 Prime (2022) मधील फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या ड्युअल सिम फोनमध्ये 3.5एमएम जॅक, आयआर ब्लास्टर आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या डिवाइसमधील 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग आणि 9वॉट रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.   

Web Title: Xiaomi Redmi 10 Prime 2022 to launch in india soon specs leaked 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.