शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

आणखी काय हवं? मोठा डिस्प्ले, 8720mAh ची दमदार बॅटरी आणि 6GB रॅमसह Xiaomi चा टॅबलेट येतोय 

By सिद्धेश जाधव | Published: April 18, 2022 1:27 PM

Xiaomi Pad 5 टॅबलेट भारतात 11 इंचाचा डिस्प्ले, 6GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8720mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.  

Xiaomi नं गेली कित्येक वर्ष टॅबलेट सेगमेंटमध्ये कोणताही डिवाइस सादर केला नव्हता. त्यामुळे अँड्रॉइड टॅबलेट सेगमेंटमध्ये सॅमसंग हा एकच ब्रँड लोकप्रिय होता. परंतु गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये कंपनीनं अँड्रॉइड टॅबलेट सेगमेंट मध्ये पुनरागमन करत Xiaomi Pad 5 चीनमध्ये लाँच केला होता. आता हा 11 इंचाचा डिस्प्ले, 6GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8720mAh बॅटरी असलेला हा डिवाइस भारतात येतोय.  

Xiaomi 12 Pro स्मार्टफोन भारतात 27 एप्रिलला लाँच होणार आहे. त्याच दिवशी Xiaomi Pad 5 देखील भारतीयांच्या भेटीला येणार आहे. अशी माहिती 91mobiles नं टिपस्टर योगेश ब्रारच्या हवाल्याने दिली आहे. Xiaomi Pad 5 सह स्टायलस आणि की-बोर्ड अ‍ॅक्सेसरीज देखील लाँच केल्या जाऊ शकतात. चीनमध्ये हा टॅब 24,000 रुपयांच्या आसपास सादर केला गेला आहे. त्यामुळे भारतीय किंमत देखील 30 हजारांच्या आत असू शकते.  

Xiaomi Pad 5 चे स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi Pad 5 मध्ये 11 इंचाचा WQHD+ ट्रूटोन डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रश रेट 1600 X 2560 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी यात कंपनीने क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसरचा वापर केला आहे. यात 6GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इनबिल्ट स्टोरेज मिळते.  

या टॅबलेटमध्ये एलईडी फ्लॅशसह 13MP चा रियर कॅमेरा मिळतो. यातील फ्रंट कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 8MP आहे. Xiaomi Pad 5 मध्ये 8,720mAh ची मोठी बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. जी 10 तास गेमिंग 16 तास व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकते. कनेक्टिविटीसाठी यात Bluetooth 5, Wi-Fi आणि USB Type C पोर्ट मिळतो. 

टॅग्स :xiaomiशाओमीtabletटॅबलेटAndroidअँड्रॉईड