शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

अरे वा! 200MP + 50MP ड्युअल प्रायमरी कॅमेऱ्यासह येणार Xiaomi चा आगामी फ्लॅगशिप फोन  

By सिद्धेश जाधव | Published: September 09, 2021 1:09 PM

200MP Camera Phone: Xiaomi च्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये दोन प्रायमरी कॅमेरे देण्यात येतील. ज्यात 50MP आणि Samsung च्या ISOCELL HP1 सेन्सर म्हणजे 200MP सेन्सरचा समावेश असेल. 

Xiaomi सतत नवनवीन टेक्नॉलॉजी आपल्या स्मार्टफोन्समध्ये देत असते. आता अश्याच एका टेक्नॉलॉजीचा वापर सर्वप्रथम शाओमीस्मार्टफोनमध्ये होताना दिसू शकतो. कंपनीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन ड्युअल प्रायमरी कॅमेऱ्यासह बाजारात दाखल होऊ शकतो. आतापर्यंत मल्टी कॅमेरा सेटअपमध्ये स्मार्टफोन कंपन्या एकच मुख्य कॅमेरा देत होत्या. दोन मुख्य कॅमेरा असलेला हा पहिला स्मार्टफोन ठरू शकतो. 

चीनी टिप्सटर Digital Chat Station ने सांगितले आहे कि, Xiaomi च्या नेक्स्ट जनरेशन फ्लॅगशिप मॉडेल 200MP + 50MP ड्युअल प्रायमरी कॅमेऱ्यासह बाजारात येईल. हा कोणता स्मार्टफोन आहे हे मात्र समोर आले नाही. परंतु हा फोन आगामी Xiaomi 12 सीरीजमधील स्मार्टफोन असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

काही दिवसांपूर्वी शाओमी 12 स्मार्टफोनची माहिती आली होती कि, या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचे तीन कॅमेरे असतील, ज्यात एक 5x पेरिस्कोप लेन्सचा देखील समावेश असेल. परंतु ताज्या लिक्सनुसार या फोनमध्ये 200 मेगापिक्सल आणि 50 मेगापिक्सलचा ड्युअल प्रायमरी कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.  

अलीकडेच दक्षिण कोरियन टेक कंपनी Samsung ने ISOCELL HP1 नावाचा जगातील पहिला 200MP मोबाईल कॅमेरा सेन्सर सादर केला होता. लाँचच्या वेळी कंपनीने सांगितले होते कि या सेन्सरच्या निर्मिती आणि शिपिंगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शाओमीच्या नव्या फोनमध्ये हा कॅमेरा दिसण्याची शक्यता जास्त  आहे. शाओमी किंवा सॅमसंगने याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोन