शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शाओमीने लॉन्च केला नवा Mi A2 स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 17:54 IST

शाओमीने Mi A2 भारतात हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनच्या लॉन्चची ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते.

शाओमीने Mi A2 भारतात हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनच्या लॉन्चची ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते. या फोनची किंमत आणि यातील फीचर्सची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. चला जाणून घेऊ या फोनची किंमत आणि फीचर्स....

Mi A2 हा स्मार्टफोन एल्यूमिनियम यूनिबॉडीने तयार करण्यात आला असून याला आर्क डिझाइनही देण्यात आलं आहे. तसेच या फोनला टाइप-सी यूएसबी पोर्ट देण्यात आलंय. या फोनची खासियत म्हणजे हा फोन अॅन्ड्रॉइड वन असलेला पहिला स्मार्टफोन आहे. याची फोनची जाडी 7.3 एमएम असून ही जाडी वनप्लस 6 पेक्षाही कमी आहे. वनप्लस 6 ची जाडी 7.8 एमएम आहे.

MI A2 चे स्पेसिफिकेशन 

कंपनीने या फोनमध्ये 5.99 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला असून ज्याचं रिजोल्युशन 2160x1080 पिक्सल आहे. त्याचबरोबर कंपनीने या फोनमध्ये 4 जीबी आणि 6 जीबी रॅमसोबत 64 जीबी आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेले दोन वेरिअंट लॉन्च केलं आहे. शाओमीने या फोनमध्ये ऑक्टा कोर 2.2 गीगाहर्टज क्वाडकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर दिला आहे. 

कॅमेरा कसा आहे?

शाओमीने फोनमध्ये ड्युअल कॅमरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये 12 मेगापिक्सलसोबत 20 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा दिला आहे. त्याचबरोबर कंपनीने 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. याव्यतिरिक्त या फोनमध्ये फिंगरप्रिंट फिचर, फेस अनलॉक फिचर देण्यात आलं आहे.

बॅटरी आणि इतर फीचर्स

स्मार्टफोनची बॅटरी 3010 एमएएच असून या फोनला क्विक चार्ज 4.0 सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यामध्ये कनेक्टिविटी फीचर 4जी एलटीई, ड्युअल-बॅड वाय-फाय ए/बी/जी/एन/एसी, वाय-फाय डायरेक्ट, मीराकास्ट, ब्लूटूथ 5.0, आयआर एमीटर आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, जायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेंसरही फोनमध्ये देण्यात आले आहेत. या फोनचं डायमेंशन 158.7 x 75.4x7.3 मिलीमीटर असून वजन 168 ग्रॅम आहे. 

Xiaomi Mi A2 किंमत आणि लॉन्च ऑफर

Xiaomi Mi A2ची भारतात किंमत 16,999 रुपयांपासून सुरू होणार आहे. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेलं वेरिएंट विकण्यात येणार आहे. हा फोन घेण्यासाठी इच्छुक असणारे ग्राहक  Xiaomi Mi A2 ची प्री-ऑर्डर बुकिंग 9 ऑगस्टपासून करू शकतात. स्मार्टफोनची विक्री 16 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. हा एक्सक्युझिव्हली अॅमेझॉन इंडिया, मी डॉट कॉम, मी होम स्टोर आणि मीच्या अधिकृत रिटेल स्टोरमध्ये विकण्यात येणार आहेत. Reliance Jio कडून लॉन्च ऑफर देण्यात आली आहे. ग्राहकांना 2,200 रुपयांचा इंस्टेंट कॅशबॅक देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त 4.5 टीबी डेटा मोफत देण्यात येणार आहेत. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलxiaomiशाओमीAndroidअँड्रॉईड