Mi Notebook Pro 14 आणि Mi Notebook Ultra 15.6 जुलैअखेर होऊ शकतात भारतात लाँच 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 03:32 PM2021-07-13T15:32:28+5:302021-07-13T15:33:53+5:30

MI Notebook India launch: शाओमी या महिनाअखेर Mi Notebook Pro 14 आणि Mi Notebook Ultra 15.6 भारतात लाँच करू शकते.  

Xiaomi may launch mi notebook pro 14 mi notebook ultra 15 6 laptops in india soon  | Mi Notebook Pro 14 आणि Mi Notebook Ultra 15.6 जुलैअखेर होऊ शकतात भारतात लाँच 

हा प्रतीकात्मक फोटो आहे.

Next

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि Xiaomi भारतात लवकरच Mi आणि Redmi ब्रँडमध्ये नवीन लॅपटॉप्स सादर करण्याची तयारी करत आहे. समोर आलेल्या नवीन रिपोर्ट्सनुसार शाओमी मी ब्रँडअंतगर्त Mi Notebook Pro 14 आणि Mi Notebook Ultra 15.6 लॅपटॉप्स भारतात लाँच करणार आहे. तसेच हे लॅपटॉप हे लॅपटॉप्स या महिन्याच्या शेवटी भारतात दाखल होऊ शकतात.  (Xiaomi mi Notebook 14 Pro Mi Notebook Ultra Launch In India Rumoured For July Check Expected Price Specs)

91mobiles ने दिलेल्या माहितीनुसार, शाओमी Mi ब्रँडअंतगर्त Mi Notebook Pro 14 आणि Mi Notebook Ultra 15.6 लॅपटॉप्स भारतात घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे Mi Notebook Pro 14 लॅपटॉप मार्चमध्ये चीनमध्ये लाँच केला गेला होता. तर Mi Notebook Ultra 15.6 गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच झालेल्या Mi Notebook Pro X 15 लॅपटॉपचा रीब्रँडेड व्हर्जन असेल.  

Xiaomi Mi Notebook Pro 14 चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स  

हे लॅपटॉप्स चीनमध्ये लाँच झालेले आहेत त्यामुळे यांची माहिती समोर आली आहे. मी नोटबुक प्रो 14 मध्ये 14 इंचाचा 2K रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये Intel 11th Gen Core i7-11370H CPU आणि Nvidia GeForce MX450 जीपीयू असू शकतो. त्याचबरोबर 16 जीबी DDR4 रॅम आहे आणि 512जीबी PCIe SSD स्टोरेज देण्यात आली आहे. कनेक्टिविटीसाठी या लॅपटॉपमध्ये वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.1, दोन यूएसबी टाइप-सी पोर्ट्स, 4 थंडरबॉल्ट पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये दोन 2वॉट स्पिकर DTS Audio प्रोसेसिंगसह मिळतात. मी नोटबुक प्रो 14 मध्ये 56 Whr ची बॅटरी देण्यात आली आहे.  

Xiaomi Mi Notebook Ultra 15.6 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Mi Notebook Ultra 15.6 मध्ये 15.6 इंचाचा 3.5K (3,456x2,160 पिक्सल रिजोल्यूशन) ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या लॅपटॉप 11th-generation Intel Core i7 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत Nvidia GeForce RTX 3050 Ti ग्राफिक्स आहे. Mi Notebook Ultra 15.6 मध्ये 32 जीबी LPDDR4x रॅम आणि 1 टीबी PCIe  स्टोरेज देण्यात आली आहे. हा लॅपटॉप Windows 10 Home एडिशनवर चालतो.  

Xiaomi च्या या लॅपटॉपमध्ये फुल-साइज, बॅकलिट कीबोर्ड आहे. यात वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, यूएसबी टाइप-सी पोर्ट, दोन यूएसबी-ए, चार थंडरबॉल्ट, एक HDMI 2.1 आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. Mi Notebook Ultra 15.6 मध्ये चार स्पिकर युनिट्स मिळतात जे DTS ऑडियोला सपोर्ट करतात. सोबत 2x2 माइक्रोफोन अरे आणि व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगसाठी बिल्ट-इन 720पी वेबकॅम मिळतो.  

Xiaomi च्या या लॅपटॉपमध्ये 80Whr ची बॅटरी मिळते. ही बॅटरी 11.5 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकते. लॅपटॉपसोबत मिळणारा 130W यूएसबी टाइप-सी पावर अडॅप्टर 25 मिनिटांत 50 टक्के बॅटरी चार्ज करू शकतो.  

Web Title: Xiaomi may launch mi notebook pro 14 mi notebook ultra 15 6 laptops in india soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.