शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
‘सैयारा’- एक अख्खी पिढी इतकी पागल का झाली आहे?
14
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
15
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
16
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
17
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
19
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
20
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  

Xiaomi ला सरकारचा जोरदार दणका; मोबाईलमधील ब्राऊझर बॅन केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 12:02 IST

चिनी कंपन्यांवर केंद्र सरकारने करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली असून अनेक अॅपवर बंदी आणली आहे.

नवी दिल्ली : चिनी कंपन्यांवर केंद्र सरकारने करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली असून अनेक अॅपवर बंदी आणली आहे. आज सरकारने देशातील सर्वात मोठी बनलेली चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीला चांगलाच दणका दिला आहे. शाओमी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये देत असलेला इनबिल्ट ब्राऊझर बॅन करण्यात आला आहे.

'Mi Browser Pro - Video Download, Free Fast & Secure' विरोधात ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. हा ब्राऊझर मोबाईलच्या परफॉर्मन्सवर वाईट पद्धतीने परिणाम करत असल्याचे समोर आले आहे. यावर कंपनीने सरकारसोबत बोलणी सुरु केली आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा ब्राऊझर मोबाईलवर परिणाम करत नसल्याचा दावा केला असून युजर अन्य कंपन्यांचे ब्राऊझर डाऊनलोड करू शकतात असेही म्हटले आहे. 

सरकारने आणखी एक चिनी अॅप QQ International ब्लॉक केले आहे. शाओमीविरोधातील कारवाईमुळे युजरना फटका बसणार नाहीय. युजर त्यांच्या स्मार्टफोनद्वारे इंटरनेट वापरू शकणार आहेत. शाओमीने भारतात 10 कोटी स्मार्टफोन विकले आहेत. शाओमी ही भारतातील सर्वाधिक खपाची कंपनी बनलेली आहे.  

शाओमीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी केंद्र सरकारच्या मंत्रालयाशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले. युजरचा डेटा स्थानिक पातळीवरच ठेवला जात असल्याचे ते म्हणाले. भारतीय कायद्यानुसार आम्ही युजरची सुरक्षा जपत आहोत, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. चीनसोबतच्या वादानंतर भारताने चिनी अॅपना दणका देण्यास सुरुवात केली होती. 29 जूनला सरकारने 59 चिनी अॅपवर बंदी आणली होती. यामध्ये टिकटॉक, युसी ब्राऊझर, Helo, Likee, Shareit, Mi Community, WeChat सारखे अॅप होते. यानंतर पुन्हा 27 जुलैला 47 अॅप बॅन केले होते.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

राजकारण बाजुला ठेवा, वडिलांना हे विचारा! आदित्य ठाकरेंवर कंगनाचा प्रश्नांचा भडीमार

लक्झरी कार 'Porsch 911' घेण्यासाठी पठ्ठ्याने असे काही केले; थेट जेलमध्ये रवानगी झाली

आजचे राशीभविष्य - 5 ऑगस्ट 2020; कर्क, सिंह राशींसाठी आज क्लेशाचा दिवस, सांभाळा

दोन दिवसांपूर्वीच कोरोनावर मात; माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुण्यात निधन

शाओमीचा स्वस्तातला Redmi 9A स्मार्टफोन येणार; 6000 पेक्षा कमी किंमत असणार

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मुलगा IAS बनला; वाचा प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहानी

यंदा LIC चा आयपीओ मालामाल करणार; या कंपन्या करणार शेअर बाजारात एन्ट्री

टॅग्स :xiaomiशाओमीchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव