शाओमीने सादर केला महिलांसाठी खास फोन; शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह आला Xiaomi CIVI  

By सिद्धेश जाधव | Published: September 28, 2021 01:05 PM2021-09-28T13:05:51+5:302021-09-28T13:06:11+5:30

Latest Xiaomi Phone Xiaomi CIVI: खास सेल्फी कॅमेरा आणि आकर्षक डिजाईनसह शाओमीने Xiaomi CIVI स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन भारतात कधी सादर होईल हे मात्र अजून समजले नाही.

Xiaomi CIVI officially launched 120Hz display 64MP camera Snapdragon 778G SoC know specs price sale offer  | शाओमीने सादर केला महिलांसाठी खास फोन; शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह आला Xiaomi CIVI  

शाओमीने सादर केला महिलांसाठी खास फोन; शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह आला Xiaomi CIVI  

Next

शाओमीने आज नवीन CIVI सीरिज बाजारात सादर केली आहे. या सीरिज अंतर्गत पहिला Xiaomi CIVI स्मार्टफोन कंपनीने आपल्या होम मार्केट चीनमध्ये सादर केला आहे. हा स्मार्टफोन्स महिलांसाठी खास सादर केल्याचे कंपनीने सांगितले आहे. म्हणून हा फोन आकर्षक आणि सुंदर डिजाईनसह बाजारात आला आहे. तसेच फोनचा सेल्फी कॅमेरा Xiaomi CIVI च्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक आहे.  

Xiaomi CIVI चे स्पेसिफिकेशन  

Xiaomi CIVI मध्ये 6.55 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो, जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन Shiny Black, Lighty Blue आणि Peach कलरमध्ये बाजारात आला आहे. हा डिवाइस अँड्रॉइड 11 सह मीयुआय 12.5 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटचा वापर करण्यात आला आह. सोबत 12GB LPDDR4x RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.  

Xiaomi CIVI मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 64MP चा प्रायमरी सेन्सर, 8 MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 MP ची मॅक्रो लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये ड्युअल सॉफ्ट एलईडी फ्लॅश आणि स्कीन रिन्यूवल टेक्नॉलॉजीसह 32 मेगापिक्सलचा Samsung GD1 सेन्सर देण्यात आला आहे. हा नवीन शाओमी फोन 4,500एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो जी 55वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. 

Xiaomi CIVI ची किंमत 

Xiaomi Civi ची किंमत चीनमध्ये 2,599 युआन (सुमारे 29,600 रुपये)पासून सुरु होते, ही 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. या फोनचा 8GB + 256GB मॉडेल 2,899 युआन म्हणजे जवळपास 33,000 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 12GB + 256GB मॉडेलसाठी 3,199 युआन (सुमारे 36,500 रुपये) मोजावे लागतील.  

Web Title: Xiaomi CIVI officially launched 120Hz display 64MP camera Snapdragon 778G SoC know specs price sale offer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app