Xiaomi आणि Redmi युजर्ससाठी खुशखबर! 500 रुपयांत बदलून घ्या बॅटरी, कंपनीनं सुरु केली नवी मोहीम

By सिद्धेश जाधव | Published: June 14, 2022 09:17 AM2022-06-14T09:17:40+5:302022-06-14T09:23:14+5:30

Xiaomi नं भारतात आपल्या स्मार्टफोन युजर्ससाठी Battery Replacement Program ची घोषणा केली आहे.  

xiaomi battery replacement program in india in just rs 499   | Xiaomi आणि Redmi युजर्ससाठी खुशखबर! 500 रुपयांत बदलून घ्या बॅटरी, कंपनीनं सुरु केली नवी मोहीम

Xiaomi आणि Redmi युजर्ससाठी खुशखबर! 500 रुपयांत बदलून घ्या बॅटरी, कंपनीनं सुरु केली नवी मोहीम

Next

Xiaomi किंवा Redmi स्मार्टफोन युजरसाठी खुशखबर आहे. कंपनीनं भारतात Battery Replacement Program सुरु केला आहे. त्यामुळे जर तुमच्या स्मार्टफोनमधील बॅटरीसंबंधित काही समस्या असेल तर तुम्ही ती स्वस्तात बदलून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला शाओमी सर्व्हीस सेंटर वर तुमचा शाओमी किंवा रेडमी स्मार्टफोन घेऊन जावं लागेल. याआधी चीनमध्ये सादर करण्यात आलेली योजना शाओमीनं आता भारतात देखील सादर केली आहे. 

Xiaomi Battery Replacement Program 

Xiaomi नं भारतातील आपल्या स्मार्टफोन युजर्ससाठी Battery Replacement Program ची घोषणा केली आहे. या प्रोग्राम अंतगर्त Xiaomi किंवा Redmi दोन्ही स्मार्टफोन युजर्स आपल्या स्मार्टफोनची बॅटरी बदलून घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या Mi Service Centre मध्ये जावं लागेल. या प्रोग्रामच्या माध्यमातून 499 रुपयांच्या बेस किंमतीत बॅटरी बदलून दिली जाईल.  

एक गोष्ट महत्वाची की, बॅटरी रिप्लेसमेंटची किंमत स्मार्टफोनच्या मॉडेलवर अवलंबून असेल. काही स्मार्टफोनची बॅटरी महाग पडू शकते. परंतु जर तुमच्या स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप कमी होत असेल, स्मार्टफोन खूप जुना झाला असेल तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊन स्वस्तात बॅटरी बदलून घेऊ शकता. त्यामुळे तुमचा बॅटरी बॅकअप वाढू शकतो. 

मोफत युट्युब प्रीमियम सब्सस्क्रिप्शन  

शाओमीच्या पुढील स्मार्टफोन्सचे ग्राहक तीन महिन्याच्या मोफत यूट्यूब प्रीमिअमचा लाभ घेऊ शकणार आहेत. यात Xiaomi 12 Pro, Xiaomi 11i, Xiaomi 11i HyperCharge and Xiaomi 11T यांचा समावेश आहे. हे स्मार्टफोन ज्यांच्याकडे आहेत त्यांना तीन महिन्यांसाठी यूट्यूब प्रीमिअम सबस्क्रिप्शन वापरता येणार आहे. दरम्यान Redmi Note 11, Note 11S, Note 11 Pro, Note 11 Pro+ आणि Xiaomi Pad 5 यूझर्सना दोन महिन्यांसाठी प्रीमिअम सबस्क्रिप्शन वापरता येणार आहे.  

शाओमी इंडियाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेलं हे खास प्रमोशन ३१ जानेवारी २०२३ पर्यंतच सुरू असणार आहे. तर प्रमोशन कालावधी संपल्यानंतरही यूट्यूब प्रीमिअम सबस्क्रिब्शन हवं असेल तर दरमहा १२९ रुपये युझर्सना भरावे लागणार आहेत. 

Web Title: xiaomi battery replacement program in india in just rs 499  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.