शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

शाओमीचा सर्वात हलका 5G फोन आला बाजारात; 20MP सेल्फी कॅमेऱ्यासह Xiaomi 11 Lite 5G NE लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: September 16, 2021 3:39 PM

Midrange 5G Phone Xiaomi 11 Lite NE Price: जागतिक बाजारात Xiaomi 11 Lite 5G NE चे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. हा फोन भारतात 23 ते 24 हजार रुपयांच्या आत उपलब्ध होईल.

Xiaomi ने आपल्या ग्लोबल लाँच इव्हेंटमधून अनेक डिवाइस सादर केले आहेत. यात Xiaomi 11T आणि Xiaomi 11T Pro सारख्या फ्लॅगशिप 5G फोन्सचा समवेश होता. त्याचबरोबर कंपनीने मिड-रेंज सेगमेंटमध्ये Xiaomi 11 Lite 5G NE देखील सादर केला. हा जुन्या Mi 11 Lite 5G चा ‘NE’ म्हणजे ‘New Edition’ आहे. हा फोन सध्या ग्लोबल मंचावर लाँच करण्यात आला आहे. परंतु Xiaomi 11 Lite 5G NE स्मार्टफोन लवकरच भारतीय चाहत्यांच्या भेटीला देखील येऊ शकतो, अशी माहिती लिक्स आणि रिपोर्ट्समधून आली आहे.  

Xiaomi 11 Lite 5G NE ची किंमत  

जागतिक बाजारात Xiaomi 11 Lite 5G NE चे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. या फोनचा 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल EUR 369 (जवळपास 32,000 रुपये) आणि 8GB RAM व्हेरिएंटची किंमत EUR 399 (जवळपास 34,600 रुपये) आहे. 91मोबाईल्सने हा फोन भारतात 23 ते 24 हजार रुपयांच्या आत उपलब्ध होईल असे सांगितले आहे.  

Xiaomi 11 Lite 5G NE चे स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi 11 Lite 5G NE मध्ये कंपनीने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778G चिपसेटचा वापर केला आहे. हा एक 5G प्रोसेसर आहे. तसेच फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये MIUI 12.5 ही कंपनीची कस्टम स्किन देण्यात आली आहे, जी Android 11 वर आधारित आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. Xiaomi 11 Lite 5G NE नावाप्रमाणे पातळ आणि हलका फोन आहे, ज्याची जाडी 6.81mm आणि वजन फक्त 158 ग्राम आहे.  

या फोनमध्ये 6.55-इंचाचा FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. डॉट नॉच डिजाईनसह येणारा हा फोन 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन, डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी Xiaomi 11 Lite 5G NE च्या बॅक पॅनलवर तीन कॅमेरे असलेला सेटअप मिळतो. ज्यात 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP ची वाईड-अँगल लेन्स आणि 5MP चा टेलीमॅक्रो कॅमेरा आहे. फ्रंट पॅनलवरील 20MP चा कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉल करण्याच्या कामी येतो. पॉवर बॅकअपसाठी या डिवाइसमध्ये 4,250mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड