शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

जिओ धमाका ! 'दिवाळी धन धना धन' ऑफर, 399 च्या रिचार्जवर स्पेशल ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 13:00 IST

रिलायन्स जिओने नवीन 'दिवाळी धन-धना-धन ऑफर'आणली आहे.12 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान ही ऑफर असणार आहे. 

मुंबई - रिलायन्स जिओने नवीन 'दिवाळी धन-धना-धन ऑफर'आणली आहे. यामध्ये 399 रूपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. 12 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान ही ऑफर असणार आहे. 

दिवाळी धन-धना-धन ऑफरमध्ये 399 रूपयांच्या रिचार्जवर वाउचर स्वरूपात 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. 50 रूपयांचे 8 वाउचर ग्राहकांना मिळतील. My Jio अॅपमध्ये हे 8 वाउचर्स मिळतील. या वाउचर्सचा फायदा भविष्यात 309 रूपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज किंवा 91 रूपये आणि त्यापेक्षा जास्तीचा डेटा रिचार्ज करताना घेता येणार आहे.  पण 15 नोव्हेंबर नंतरच या वाउचर्सचा वापर करता येणार आहे. 

जिओ युजर्स सावधान ! 'या' अटीचं उल्लंघन केल्यास फ्री कॉल सर्व्हिस होणार बंदरिलायन्स जिओ रोज नवनवे प्लान्स आणून मोबाइल युजर्सना आफल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान रिलायन्स जिओ आपल्या युजर्सना झटका देण्याच्या तयारीत आहे. जिओने अशा युजर्सवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे, जे दिवसाला 300 हून अधिक जास्त कॉल्स करत आहेत. आपल्या जिओ क्रमांकाचा व्यवसायिक वापर करणा-यांवर जिओची नजर आहे. रिलायन्स जिओदेखील इतर कंपन्यांप्रमाणे डेली लिमिट लागू करण्याची शक्यता आहे. काही मोबाइल कंपन्या दिवसाला 300 फोन कॉल्स आणि संपुर्ण आठवड्यात 1200 हून जास्त फ्री कॉल्स करण्याची सुविधा देत नाहीत, त्याहून जास्त कॉल केल्यास चार्ज लागतो. रिलायन्स जिओदेखील अशाप्रकारे मर्यादा लागू करण्याची शक्यता आहे.

व्यवसायिक वापरसाठी जिओ क्रमांकाचा वापर करणा-यांवर जिओने नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्हीदेखील जिओ क्रमांकाचा व्यवसायिक वापर करत असाल तर कॉल लिमिट लागू होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला तुमची सेवा अखंडित ठेवायची असल्यास व्यवसायिक वापर करणं बंद करावं लागणार आहे. व्यवसायिक वापर केल्यास कंपनीकडे फ्री कॉलिंग बंद करण्याचा अधिकार आहे.

रिलायन्स जिओने आपल्या 4जी फोनची डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली आहे. जिओ हा फोन शून्य रुपयात देत आहे. त्यासाठी फक्त एकच अट आहे, ती म्हणजे 1500 रुपयांचं सेक्युरिटी डिपॉजिट भरावं लागेल. हे डिपॉजिट तीन वर्षांनी पुन्हा परत केलं जाईल. संपुर्ण डिपॉजिट परत हवं असल्यास, वर्षाला किमान 1500 रुपयांचा रिचार्ज करणं बंधनकारक असणार आहे. तेव्हाच तुम्हाला तुमचे 1500 रुपये परत मिळतील. 

जर तुम्ही जिओ मोबाइल फोनचं प्री बुकिंग केलं होतं आणि अद्याप तुम्हाला तो मिळाला नसेल तर तुम्ही ते माहिती करु शकता. तुमच्या मोबाइल फोनचा स्टेटस काय आहे हे जाणून घेण्यासाठी 18008908900 या क्रमांकावर फोन करा. येथे तुमचा रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक मागितला जाईल. ज्या मोबाइल क्रमांकावरुन तुम्ही जिओ मोबाइल फोनचं प्री बुकिंग केलं असेल तोच क्रमांक तुम्हाला द्यायचा आहे. यानंतर जेव्हा तुम्ही तुमचा मोबाइल क्रमांक द्याल तेव्हा तुमच्या फोनचं स्टेटस कळेल. 

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओ