जिओचा सर्वात स्वस्त अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग प्लॅन, तोडला स्वतःचाच रेकॉर्ड 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 03:08 PM2017-10-03T15:08:42+5:302017-10-03T15:38:29+5:30

रिलायन्स जिओ पुन्हा एकदा धमाका करण्याच्या तयारीत आहे. आता कंपनीने स्वतःचाच जुना रेकॉर्ड तोडला आहे. कंपनीने नवीन अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग प्लॅन लॉन्च केला आहे.

jio data recharge plan offers reliance jio launch its all time lowest calling and data recharge plan for prepaid customer | जिओचा सर्वात स्वस्त अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग प्लॅन, तोडला स्वतःचाच रेकॉर्ड 

जिओचा सर्वात स्वस्त अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग प्लॅन, तोडला स्वतःचाच रेकॉर्ड 

मुंबई - रिलायन्स जिओ पुन्हा एकदा धमाका करण्याच्या तयारीत आहे. आता कंपनीने स्वतःचाच जुना रेकॉर्ड तोडला आहे. कंपनीने नवीन अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग प्लॅन लॉन्च केला आहे. केवळ 149 रूपयांचा नवा प्लॅन कंपनीने आणला आहे. 

149 रूपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळणार आहे.  तसंच 300 मेसेज देखील मोफत असणार आहे.  28 दिवसांसाठी या प्लॅनची वैधता असणार आहे. या प्लॅननुसार एका महिन्यासाठी ग्राहकाला  2GB हाय स्पीड डेटा मिळणार आहे.  2GB ची मर्यादा संपल्यानंतरही इंटरनेट अनलिमिटेड सुरू राहणार पण स्पीड कमी होऊन 64kbps  होईल. 

 सध्या रिलायन्स जिओ 399 रूपयात ग्राहकांना धन धना धन ऑफर देत आहे. यामध्ये 84 दिवसाची वैधता आहे. याशिवाय ग्राहकांना दररोज 1GB डेटा मिळत आहे. 1 1GB डेटाची मर्यादा संपल्यानंतर स्पीड 128kbps होतो. याशिवाय य प्लॅनमध्ये जिओचे अॅप्स आणि टीव्हीचं सबस्क्रिप्शन फ्री मिळतं. 

रिलायन्स जिओ इंटरनेट स्पीडमध्येही अव्वल -

रिलायन्स जिओने सरासरी मासिक डेटा स्पीडमध्ये जुलैमध्ये बाजी मारत अव्वल क्रमांक मिळवला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली.
सरासरी डेटा स्पीडमध्ये ट्रायच्या यादीत जिओ गेल्या सात महिन्यांपासून अव्वल क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्या पिछाडीवर आहेत.
जिओचं डाऊनलोडिंग स्पीड जुलैमध्ये 18.331 Mbps होतं, तर एअरटेल 9.266 Mbps, आयडिया 8.883 Mbps आणि व्होडाफोनचं डाऊनलोडिंग स्पीड 9.325 Mbps एवढं होतं.
जिओने मोफत व्हॉईस कॉलिंग आणि मोफत अनलिमिटेड डेटासह दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. VoLTE सेवा देणारी जिओ देशातील एकमेव कंपनी आहे. सर्वाधिक डेटा वापरणाऱ्या देशांच्या यादीत भारत 155 व्या स्थानाहून पहिल्या स्थानावर आला आहे.
जिओ येण्यापूर्वी भारतात महिन्याला 20 कोटी GB डेटा वापरला जायचा. हा आकडा आता 150 कोटी GB झाला आहे. ज्यापैकी केवळ जिओचे ग्राहकच 125 कोटी GB डेटा वापरतात.
देशातील 75 टक्के लोकांकडे जिओ नेटवर्क असल्याचा दावा कंपनीने केला आहे. येत्या एका वर्षात 99 टक्के लोकांकडे जिओ असेल, असंही कंपनीने म्हटलं आहे. जिओने सर्वात वेगाने ग्राहक जोडण्याचाही विक्रम केला. कंपनीने लाँचिंगनंतर 170 दिवसात प्रत्येक सेकंदाला 7 ग्राहक जोडून फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअप यांचाही विक्रम मोडला.

Web Title: jio data recharge plan offers reliance jio launch its all time lowest calling and data recharge plan for prepaid customer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.