शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जिओ धमाका! चकाचक iPhone X केवळ 26,700 रुपयात...वाचा काय आहे अट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 17:30 IST

iPhone X ची विक्री भारतात सुरू झाली आहे. भरमसाठ किंमत असून देखील या फोनची जोरदार विक्री सुरू आहे. सध्या ज्यांनी या फोनची प्री-बुकिंग केली होती त्यांनाच हा फोन मिळतोय. पण आता हा फोन तुम्ही केवळ 26 हजार 700 रूपयांमध्ये खरेदी करू शकतात.

मुंबई:  iPhone X ची विक्री भारतात सुरू झाली आहे. भरमसाठ किंमत असून देखील या फोनची जोरदार विक्री सुरू आहे.  सध्या ज्यांनी या फोनची प्री-बुकिंग केली होती त्यांनाच हा फोन मिळतोय.भारतात  iPhone X 64GB व्हेरिअंटची किंमत 64 हजार रूपये आहे, तर 128GB व्हेरिअंटची किंमत  1 लाख 2 हजार रुपये आहे.  पण आता हा फोन तुम्ही केवळ 26 हजार 700 रूपयांमध्ये खरेदी करू शकतात. पण त्यासाठी काही अटी आहेत. रिलायन्स जिओने ज्या प्रमाणे  iPhone 8, 8 Plus वर कॅशबॅक ऑफर दिली होती तशीच ऑफर iPhone X साठी आणली आहे. हो...हे खरंय... जिओ कंपनी 70 टक्के बायबॅक देणार आहे. पण ही ऑफर मिळवण्यासाठी जिओने एक महत्वाची अट ठेवली आहे. तुम्ही वर्षभर हा फोन वापरून सुस्थितीत जर रिलायन्स जिओला परत केला तर कंपनी तुम्हाला 70 टक्के बायबॅक देणार आहे.  काय आहे अट -सर्वात पहिले तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की बायबॅक ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला हा फोन एका वर्षाच्या वापरानंतर सुस्थितीत रिलायन्स जिओला परत करावा लागेल. या व्यतिरिक्त दर महिन्याला 799 रूपयांचं रिचार्ज करणं आवश्यक आहे. या रिचार्जद्वारे तुम्हाला  90GB 4G डेटा आणि अनिलिमिटेड कॉलिंग मिळेल. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एकाचवेळी 9,999 रूपये भरून एका वर्षासाठी रिचार्ज करू शकतात. म्हणजे तुम्ही केवळ 26 हजार 700 रूपयांमध्ये हा फोन खरेदी करू शकतात असं नाहीये. तर फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण किंमत द्यावी लागेल. तसंच फोन वर्षभर वापरून परत केल्यानंतर जिओ तुम्हाला 70 टक्के पैसे परत देईन असंही नाहीये. तर त्या बदल्यात तुम्ही तेथून दुसरा स्मार्टफोन खरेदी करू शकतात आणि यासाठी कंपनी तुम्हाला व्हाउचर देणार आहे.दरवर्षी नवा  iPhone घेणा-यासाठी ही खूप चांगली ऑफर आहे, पण इतरांना या ऑफरचा फायदा होणार नाही. कशी मिळवायची ऑफर -   जिओच्या अधिकृत वेबसाइटवर iPhone X बायबॅक या पर्यायावर क्लिक करावं. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. वेबसाइटनुसार सिटी बॅंकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर 8000 रूपये एक्स्ट्रा कॅशबॅक मिळणार आहे.   

टॅग्स :Apple iPhone Xअ‍ॅपल आयफोन XJioजिओReliance Jioरिलायन्स जिओ