शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

काळीज तुटले! टेस्लाची कार वितळवली आणि बनवला iPhone; किंमतीचा विचारही मनात आणू नका...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 4:07 PM

रशियाच्या लक्झरी वस्तू तयार करणाऱ्या एका कंपनीनं iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max Electro ची घोषणा केली आहे.

Tesla च्या इलेक्ट्रीक कार्स या दिवसांमध्ये चर्चेत आहेत. तर काही लोक याच्या प्रतीक्षेतही आहेत. परंतु नुकताच टेस्लाची कार वितळवून आयफोन तयार करण्यात आला आहे. रशियाच्या लक्झरी वस्तू तयार करणाऱ्या कंपनीनं हा कारनामा केला आहे. कॅवियर आपल्या प्रीमिअम प्रोडक्ट्ससाठी जगभरात प्रसिद्ध आहे, परंतु आता या कंपनीनं चक्क कारच वितळवून मोबाईल तयार केलाय. जगातील सर्वात प्रसिद्ध टेस्ला मॉडेल ३ वितळवून फोनची बॉडी तयार करण्यात आलीये. 

कॅवियरनं नुकताच आपल्या काही लक्झरी प्रोडक्ट्सवरून पडदा उठवला. कंपनी आता स्पेसएक्स आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्या मूर्तीसोबत एक नवी हाय एन्ड कस्टम अॅपल आयफोन १३ प्रो सीरिज लाँच केली आहे. दोन्ही कस्टम आयटम्स एकमेकांपासून निराळे आहेत. परंतु दोघांमध्ये एक साम्य आहे आणि ते म्हणजे या दोन्हीची बॉडी टेस्लाची कार वितळवून तयार केली आहे.

कंपनीनं iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max Electro ची घोषणा केली आहे. हे मॉडेल्स लेटेस्ट कस्टमाईज्ड आयफोन १३ हँडसेट आहेत. हे कंपनीचा पोर्टफोलिओ, ज्यात रोलेक्स इन्स्पायर्ड, गोल्ड प्लेटेड आणि एक डायनासोर टूथ स्पोर्टिंग आयफोन १३ प्रो मॉडेलच्या लाइनअपमध्ये सामील आहे. याची विशेष बाब म्हणजे याची फ्रेम ब्लॅक पीव्हीडी कोटिंगसह टायटेनियमनं तयार करण्यात आली आहे.

९९ टेस्ला इलेक्ट्रो मॉडेलंचं उत्पादनबॉडीमध्ये एक व्हाईट शॉक रेझिस्टंस कंपोझिट मटेरिअल आणि एक अॅल्युमिनिअम पॅनलही आहे. हे मटेरिअल टेस्लाच्या कारच्या बॉडीपासून तयार करण्यात आलंय. यात एल मस्क, टेस्ला लोगो आणि अन्य बाबींचाही समावेश करण्यात आला आहे. कंपनी केवळ ९९ टेस्ला इलेक्ट्रो मॉ़डेल्स तयार करत आहे. याच्या बेस मॉडेलची किंमत ६७६०  डॉलर्स म्हणजेच जवळपास पाच लाख रूपये असेल.

याशिवाय कॅविअरनं एलॉन मस्क यांची मूर्तीही तयार केली आहे. यात डबल गोल्ड प्लेटेड प्लॅगसह काळा संगमरवराचाही वापर करम्यात आला आहे. यात बस्टचा सीरिअल नंबर असून याचे २७ युनिट तयार केली जातील. ज्यांना ही मूर्ती खरेदी करायची असेल त्यांना ३२२० डॉलर्स म्हणजेच जवळपास २.४० लाख रूपये खर्च करावे लागतील.

टॅग्स :Teslaटेस्लाrussiaरशिया