9 कोटींना विकला गेला जगातील सर्वात धोकादायक लॅपटॉप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 03:22 PM2019-05-29T15:22:33+5:302019-05-29T15:29:49+5:30

जगातील सर्वात धोकादायक लॅपटॉपची 13 लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास 9 कोटी रुपयांना विक्री करण्यात आली आहे. सॅमसंगच्या या लॅपटॉपमध्ये जगातील सहा सर्वात धोकादायक व्हायरस आहेत. 

worlds most dangerous laptop sold for roughly 9 crore rupees | 9 कोटींना विकला गेला जगातील सर्वात धोकादायक लॅपटॉप

9 कोटींना विकला गेला जगातील सर्वात धोकादायक लॅपटॉप

Next
ठळक मुद्देजगातील सर्वात धोकादायक लॅपटॉपची 13 लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास 9 कोटी रुपयांना विक्री करण्यात आली आहे. सॅमसंगच्या या लॅपटॉपमध्ये जगातील सहा सर्वात धोकादायक व्हायरस आहेत. Samsung NC10 लॅपटॉपमध्ये असलेल्या या व्हायरसनी जगभरात जवळपास 95 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे.

नवी दिल्ली - तंत्रज्ञानाच्या जगात स्मार्टफोन, लॅपटॉप यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जगातील सर्वात धोकादायक लॅपटॉपची 13 लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास 9 कोटी रुपयांना विक्री करण्यात आली आहे. सॅमसंगच्या या लॅपटॉपमध्ये जगातील सहा सर्वात धोकादायक व्हायरस आहेत. 

Samsung NC10 लॅपटॉपमध्ये असलेल्या या व्हायरसनी जगभरात जवळपास 95 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. हा लॅपटॉप सेफ ठेवण्यासाठी यामध्ये देण्यात आलेले पोर्ट डिसेबल करण्यात आले आहे. Windows XP लॅपटॉपची आर्ट वर्कच्या रुपात विक्री करण्यात आली असून The Persistence of Chaos हे नाव देण्यात आले आहे. 

इंटरनेट आर्टिस्ट गुओ ओ डॉन यांनी सायबर सिक्यॉरिटी कंपनी डीप इन्सिंक्टसोबत मिळून हा लॅपटॉप तयार केला आहे. या लॅपटॉपमध्ये Wanna Cry रॅनसमवेयरसारखा धोकादायक व्हायरस आहे. मे 2017 मध्ये या व्हायरसने अटॅक केला होता. 150 देशातील 200000 पेक्षा अधिक संगणकांना त्याचा फटका बसला होता. Wanna Cry या व्हायरसमुळे जवळपास 4 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं होतं. सॅमसंगच्या या लॅपटॉपमध्ये MyDoom नावाचा एक व्हायरसही आहे. तसेच यासोबतच ILOVEYOU नावाचा देखील एक व्हायरस आहे. पाच लाख संगणकांना या व्हायरसचा फटका बसला होता. SoBig आणि DarkTequila नावाचे धोकादायक व्हायरसही याच लॅपटॉपमध्ये आहेत. 

दोन स्क्रीनवाला जगातील पहिला लॅपटॉप लाँच, जाणून घ्या खासियत

लोकप्रिय टेक्नॉलॉजी कंपनी असुस (Asus) ने कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. यामध्ये कंपनीने लाँच केलल्या ड्यूल स्क्रीनवाल्या लॅपटॉपची सर्वाधिक चर्चा आहे. Asus ZenBook Pro Duo असं या लॅपटॉपचं नाव असून तो जगातील पहिला दोन स्क्रीन असलेला लॅपटॉप आहे. ZenBook Pro Duo मध्ये देण्यात आलेली दुसरी स्क्रीन कीबोर्डसोबतच्या एरियामध्ये देण्यात आली आहे. कीबोर्डच्या अगदी वरच्या बाजूला ही स्क्रीन देण्यात आली आहे. दोन स्क्रीन असलेल्या या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाची 4K UHD OLED HDR सपोर्टिंग टच स्क्रीन देण्यात आली आहे. युजर्स कोणतीही विंडो दुसऱ्या स्क्रीनवर ड्रॅग करू शकतात. मेन स्क्रीनमध्ये असुसने नॅनो एज डिजाईनचा वापर केला आहे. जेणेकरून डिस्प्लेला चारही बाजूने थिन बेजल्स देण्यात आले आहेत. लॅपटॉपमध्ये 9th जनरेशन इंटेल कोर i7 (9750H) किंवा i9 (9980HK) प्रोसेसर देण्यात येणार असून 32GB DDR4 रॅम दिली जाणार आहे.

 

Web Title: worlds most dangerous laptop sold for roughly 9 crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.