जगातील पहिला सुपरफास्ट प्रोसेसर; Xiaomi Mi 11 फ्लॅगशिप फोन लाँच, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 04:06 PM2020-12-29T16:06:45+5:302020-12-29T16:07:12+5:30

Xiaomi Mi 11 launched: Mi 11 हा जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा सध्याचा जगातील सर्वात फास्ट प्रोसेसर आहे. 

world's first superfast processor; Xiaomi Mi 11 flagship phone launch, find out the price | जगातील पहिला सुपरफास्ट प्रोसेसर; Xiaomi Mi 11 फ्लॅगशिप फोन लाँच, जाणून घ्या किंमत

जगातील पहिला सुपरफास्ट प्रोसेसर; Xiaomi Mi 11 फ्लॅगशिप फोन लाँच, जाणून घ्या किंमत

Next

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi) ने Xiaomi Mi 11 अधिकृतरित्या लाँच केला आहे. Mi 11 हा जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा सध्याचा जगातील सर्वात फास्ट प्रोसेसर आहे. 


Xiaomi Mi 11 शाओमीचा सर्वात अद्ययावत डिस्प्ले आहे. Mi 11 च्या डिस्प्लेला E4 लाइट इमिटिंग मटेरिअलद्वारे बनविण्यात आले आहे. फोनचे कोण हे गोलाकार आहेत आणि डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2के आहे. Xiaomi Mi 11 ची किंमत चीनमध्ये 3,999 युआन म्हणजेच भारतीय रुपयांत 45000 रुपये आहे. या किंमतीत 8 जीबी रॅम आणि 128 जीबीची स्टोरेज देण्यात आली आहे. तर दुसरीकडे 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत 4299 युआन म्हणजेच 48,300 रुपये आहे. या फोनचा टॉप व्हेरिअंट 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असून याची किंमत 52800 रुपये आहे. 

फोनमध्ये ड्युअर सिम सपोर्ट देण्यात आला असून अँड्रॉईड 10 वर आधारित MIUI 12.5 देण्यात आली आहे. 6.81 इंचाचा 2K WQHD डिस्प्ले देण्यात आला असून 1440x3200 पिक्सलचे रिझोल्यूशन आहे. डिस्प्लेला पंच होल देण्यात आला असून रिफ्रेश रेट 120Hz आहे. HDR10+ सोबत मोशन इस्टिमेशन, मोशन कॉम्पेन्सेशन (MEMC) देखील आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास Victus देण्यात आली आहे. 


कॅमेरा
Mi 11 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला असून यामध्ये मेन लेन्स 108 मेगापिक्सलची आहे. याची पिक्सल साईज 1.6 माइक्रॉन व अपर्चर f/1.85 आहे. यासोबत ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनही आहे. हा कॅमेरा आयफोन 12 च्या तुलनेत  3.7 पटींनी मोठा असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरी लेन्स 13 मेगापिक्सल आणि तिसरी 5 मेगापिक्सल मायक्रो लेन्स आहे. फोनमध्ये 20 मेगापिक्सल फ्रँट कॅमेरादेखील आहे. 


हा ५जी फोन असून यामध्ये Mi TurboCharge 55W ची 4600mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच 10W चा रिव्हर्स चार्जिंग सपोर्टही आहे. फोनचे वजन 194 ग्रॅम आहे. 

Web Title: world's first superfast processor; Xiaomi Mi 11 flagship phone launch, find out the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.