शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

World Emoji Day : 'या' इमोजीला भारतात सर्वाधिक पसंती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 11:07 IST

व्हॉट्सअ‍ॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.17 जुलै रोजी जागतिक इमोजी दिवस साजरा केला जातो. आनंदाचे अश्रू येणारा आणि ब्लोईंग किस देणारा इमोजी अशा दोन इमोजीचा भारतात सर्वाधिक वापर

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मजा, मस्करी, राग, प्रेम यांसारख्या कोणत्याही भावना व्यक्त करायच्या असल्यास इमोजीचा सर्रास वापर होतो. 17 जुलै रोजी जागतिक इमोजी दिवस साजरा केला जातो. आनंदाचे अश्रू येणारा आणि ब्लोईंग किस देणारा इमोजी अशा दोन इमोजीचा भारतात सर्वाधिक वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर चॅटिंग करताना हे इमोजी वापरले जातात.

जागतिक इमोजी दिनाच्या पूर्वसंध्येला टेक कंपनी 'बोबल एआय'ने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतीयांनी पसंती दिलेल्या दोन इमोजीबाबत माहिती देण्यात आली आहे. आनंदाश्रू आणि ब्लोईंग किस या दोन इमोजीचा भारतात सर्वाधिक वापर होतो. तर टॉप 10 इमोजींमध्ये स्माईलिंग फेस विथ हार्ट आइज, किस मार्क, ओके हँड, लाउडली क्राईंग फेस, बिमिंग फेस विथ स्माईलिंग आइज, थम्स अप, फोल्डेड हँड्स आणि स्माईलिंग विथ सनग्लासेस या इमोजीचा समावेश आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवरही या इमोजी आहेत. सण आणि राष्ट्रीय उत्सवादरम्यान इमोटिकॉन्सचा वापर सर्वाधिक झाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. डेटिंग अ‍ॅपमध्ये आनंद व्यक्त करताना, फ्लर्टी आणि रोमांटिक इमोजीचा सर्वाधिक वापर होतो. बोबल एआयचे सहसंस्थापक अनित प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमोजी हळूहळू आपल्या डिजिटल संस्कृतीचा एक भाग झाले आहेत. संवाद साधण्याचा हा एक नवा मार्ग आहे. जगभरात पहिली इमोजी 'स्माईली' आहे. हसण्याने सुरुवात झालेल्या या इमोजींची क्रेझ प्रचंड वाढली आहे. त्यामुळेच आता केवळ स्माईलीपुरतीच इमोजी मर्यादीत राहिली नसून अनेक वेगवेगळ्या भावनांच्या इमोजी तयार झाल्या आहेत. 

WhatsApp वरच्या चॅटिंगची गंमत वाढणार, 230 नवीन इमोजी येणार

व्हॉट्सअ‍ॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे कारण इमोजीच्या लिस्टमध्ये 230 नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने 2019 साठी नवीन 230 इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील इमोजीच्या लिस्टमध्ये 59 नवीन इमोजीमध्ये 171 व्हेरिअंटचा समावेश आहे. या नवीन इमोजीमध्ये प्राणी, फळ, भाज्या, मेकॅनिकल आर्म, वेफल, आईस क्यूब, ब्लड ड्रॉप, बटर, रिक्षा अशा अनेक इमोजींचा समावेश आहे. नवीन इमोजीमध्ये व्हीलचेअरवर बसलेला माणूस, गाईड डॉगसारख्या नव्या इमोजींचा समावेश आहे. तसेच युनिकोडने काही नवीन रंगाची चिन्हंही प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये ह्रदय, सर्कल आहे. यासोबतच युजर्सच्या मागणीनुसार सफेद ह्रदयाच्या चिन्हांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. हे इमोजी फायनल करण्यात आले असले तरी काही दिवसानंतर ते स्मार्टफोनमध्ये उपलब्ध होणार आहेत. नवीन इमोजी या वर्षाच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत स्मार्टफोनमध्ये दिसण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया