AIच्या मदतीने सामान्य माणूस बनवू शकतो अणुबॉम्ब! एआयच्या 'गॉडफादर'चा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 12:47 IST2025-09-08T12:46:50+5:302025-09-08T12:47:15+5:30

'एआय'चे गॉडफादर जेफ्री हिंटन यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य धोक्यांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

With the help of AI, a common man can make a nuclear bomb! Warning from the 'godfather' of AI | AIच्या मदतीने सामान्य माणूस बनवू शकतो अणुबॉम्ब! एआयच्या 'गॉडफादर'चा इशारा

AIच्या मदतीने सामान्य माणूस बनवू शकतो अणुबॉम्ब! एआयच्या 'गॉडफादर'चा इशारा

'एआय'चे गॉडफादर जेफ्री हिंटन यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य धोक्यांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. एआय लोकांना जैविक शस्त्रे तयार करण्यास मदत करू शकते आणि भविष्यात हे मानवतेसाठी धोका बनू शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. चॅटजीपीटीशी संबंधित अलीकडील आत्महत्यांच्या घटनांनी देखील या चिंतांना बळकटी दिली आहे. एआयच्या विकासाऐवजी त्याच्या तोट्यांचा गांभीर्याने विचार करण्यावर हिंटन यांनी भर दिला आहे.

साध्य जिथे लक्ष जाईल, तिथे एआयचे कौतुक होताना दिसत आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने दिवसभराचे कामही अगदी तासाभरात पूर्ण करता येते. पण, एआय जितका फायदेशीर आहे, तितकाच तो मानवतेसाठी धोकादायकही ठरू शकतो. काही काळापूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की, एका १६ वर्षांच्या मुलाने चॅटजीपीटीमुळे आत्महत्या केली, तर एका व्यक्तीने एआय टूलच्या प्रभावाखाली आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली.

अशी खळबळजनक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर, गेल्या काही काळापासून एआय टूल्समुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता 'एआय'चे गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन यांनीही एआयच्या संभाव्य हानीबद्दल इशारा दिला आहे.

एआय मानवतेसाठी धोका!
एआय विकासाला गती देण्याऐवजी, जेफ्री हिंटन यांनी भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एआय मानवतेसाठी धोका ठरू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, हे तंत्रज्ञान अणुबॉम्ब बनवण्यात कोणालाही मदत करू शकते. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालात असे म्हटले आहे की, जेफ्री हिंटन म्हणाले की, एआयच्या मदतीने, एक सामान्य माणूस लवकरच जैविक शस्त्रे बनवू शकतो आणि हे खूप धोकादायक आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात धोका वाढू शकतो.

एआय बुद्धिमान आहे, पण...
एआय गॉडफादर जेफ्री हिंटन यांनी एआय बुद्धिमान आहे, असं म्हणत देखील चिंता व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात एआय अनुभव मानवी अनुभवापेक्षा फारसा वेगळा नाही. मात्र, एआयच्या धोक्यांबद्दल जेफ्री हिंटनच्या मतांशी सर्वजण सहमत नाहीत. त्यांचे माजी सहकारी यान लेकुन म्हणतात की, एआय मॉडेल मर्यादित आहेत आणि ते अद्याप जगाशी अर्थपूर्ण संवाद साधण्यास सक्षम नाहीत.

Web Title: With the help of AI, a common man can make a nuclear bomb! Warning from the 'godfather' of AI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.