स्मार्टफोन आणखी महागणार? सीसीआयने गुगलवर आकारलेल्या दंडाचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 07:58 IST2023-01-24T07:58:39+5:302023-01-24T07:58:53+5:30
कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) आकारलेल्या दंडामुळे भारतात स्मार्टफोन आणखी महाग होतील, असा इशारा गुगल कंपनीने दिला आहे.

स्मार्टफोन आणखी महागणार? सीसीआयने गुगलवर आकारलेल्या दंडाचा परिणाम
कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) आकारलेल्या दंडामुळे भारतात स्मार्टफोन आणखी महाग होतील, असा इशारा गुगल कंपनीने दिला आहे.
९७% भारतातील फोनना एकटी गुगल कंपनी ॲण्ड्रॉइड प्लॅटफॉर्म पुरविते. त्यामुळे कंपनीच्या निर्णयाची झळ मोठ्या प्रमाणात बसणार आहे.
काय परिणाम?
यामुळे ॲप विकसित करणारे, स्मार्ट फोनचे पार्ट्स बनविणारे यांना येणारा खर्च वाढू शकतो. पर्यायाने खरेदीदारांना फोनसाठी अधिक किंमत मोजावी लागू शकते.
वर्चस्वाचा गैरफायदा घेतल्याचा ठपका
- सीसीआयने गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ॲण्ड्रॉइडमधील वर्चस्वाचा गैरफायदा घेतल्याचा ठपका ठेवत १६१ दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला आहे.
- दंड आकारताना प्ले स्टोअरच्या माध्यमातून कंपनीने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. - सीसीआय
या आदेशाने कंपनीला ॲण्ड्रॉइड प्लॅटफॉर्म ग्राहकांसाठी कोणत्या किमतीत उपलब्ध करून द्यावा याचा फेरविचार करावा लागेल. यामुळे भविष्यात फोनच्या किमती वाढू शकतात.
- गुगल