...म्हणून तिरपी लावली जाते DTH ची छत्री; जाणून घ्या, जर सरळ लावली तर काय होईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 05:02 PM2022-05-29T17:02:25+5:302022-05-29T17:09:43+5:30

खरेतर या छत्र्या तिरप्या बघून आपल्याला त्यांची एवढी सवय झाली आहे, की या छत्र्या तिरप्या का बसवतात? याचा आपण कधी विचारही करत नाही.

Why the DTH antenna is tilted; Know, what will happen if it is planted straight? | ...म्हणून तिरपी लावली जाते DTH ची छत्री; जाणून घ्या, जर सरळ लावली तर काय होईल?

...म्हणून तिरपी लावली जाते DTH ची छत्री; जाणून घ्या, जर सरळ लावली तर काय होईल?

Next

आपण अनेक वेळा पाहिले असेल, की डीटीएचचा (DTH) अँटेना नेहमी तिरपाच बसवलेला असतो. पण हा  अँटेना नेहमी तिरपाच का बसवतात? यावर तुम्ही कधी विचार केलाय? खरेतर या छत्र्या तिरप्या बघून आपल्याला त्यांची एवढी सवय झाली आहे, की या छत्र्या तिरप्या का बसवतात? याचा आपण कधी विचारही करत नाही.

असे आहे कारण -
डीटीएच अँटेना तिरपा बसवण्यामागे काही विशेष कारणा आहे. जर आपण हा अँटेना तिरपा बसवला नाही, तर तो त्यांचे काम करू शकणार नाही. DTH अँटेना सिग्नल्स कॅच करून ते आपल्या टीव्हीमध्ये दृश्य स्वरुपात कन्व्हर्ट करून दाखवतो. जर अँटेना तिरपा लावला नाही, तर असेल होणार नाही. 

खरे तर, हा अँटेना तिरपा लावण्यामागचे मुख्य कारण आहे त्याचे डिझाईन. हा अँटेना तिरपा असल्याने जेव्हा किरण त्याच्या पृष्ठभागावर येऊन आदळतात तेव्हा ते परत परावर्तित होत नाहीत. याच्या डिझाईनमुळे हे किरण फोकसवर केंद्रित होतात. हा फोकस पृष्ठभागाच्या माध्यमापासून थोड्या अंतरावर असतो.

अँटेना सरळ लावल्यास काय होईल? -
डीटीएच अँटेना सरळ बसवला तर काय होईल? यावर कधी आपण विचार केला? जर आपण DTH अँटेना सरळ बसवला, तर कीरण त्याच्या पृष्ठभागावर आदळतील आणि परावर्तित होऊन परत जातील. परिणामी हे किरण फोकसवर केंद्रित होणार नाहीत. 

डीटीएच अँटेना ऑफसेट असतो. थोडक्यात तो कॉनकेव्ह पृष्ठभागाशी मिळता-जुळता असतो. जेव्हा सिग्नल या पृष्ठभागावर आदळतात, तेव्हा ते अँटेनाला असलेल्या फीड हॉर्नवर केंद्रित होतात. हेच फीड हॉर्न सिग्‍नल्‍स रिसिव्ह करतात.

Web Title: Why the DTH antenna is tilted; Know, what will happen if it is planted straight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.