ओहामा : बर्कशायर हाथवेचे चेअरमन आणि प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी आज मोठा खुलासा केला आहे. अॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांना कमी लेखल्याने मोठे नुकसान झाल्य़ाचे त्यांनी मान्य केले आहे. यामुळे उशिराने अॅमेझॉनचे शेअर खरेदी करणे ही चूक केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वॉरेन बफे यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करून एक यशस्वी गुंतवणूकदार होण्याचा मान मिळविला आहे. मात्र, एवढा मोठा गुंतवणूकदाराकडूनही अंदाज लावण्यात चूक होते हे काही पटण्यासारखे नाही. मात्र, बफे यांनी गुरुवारी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हे मान्य केले आहे. त्यांच्या कंपनीने अॅमेझॉनचे शेअर्स खरेदी केले आहे. या महिन्यात याची माहिती देण्यात येईल. तसेच त्यांनी अॅमेझॉनचा चाहता झाल्याचेही सांगत या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यात उशिर केल्याची खंत व्यक्त केली.
बफे यांच्या या मुलाखतीनंतर शुक्रवारी अॅमेझॉनच्या शेअर्समध्ये 3.24 टक्कयांची वाढ झाली. हा शेअर 1,962.46 डॉलरवर बंद झाला. यंदा कंपनीच्या शेअरमध्ये 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. अॅमेझॉनचे बाजार मुल्य 966.2 अब्ज डॉलर आहे. गेल्यवर्षी हा आकडा 1 पद्म होता. जेफ बेजोस हे जगातील सर्वात श्रींमत व्यक्ती आहेत. त्याच्यावकडे 118 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.