शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

... तर WhatsApp भारतातून गाशा गुंडाळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 10:49 IST

भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअ‍ॅपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअ‍ॅपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. भारतात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या अधिक असून व्हॉट्सअ‍ॅपचे 20 कोटी युजर्स आहेत. कंपनीसाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रस्तावित नियमांमध्ये मेसेजसचा शोध घेणे ही सर्वात मोठी समस्या आहे.  

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय मेसेंजिंग अ‍ॅप असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. मात्र भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअ‍ॅपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. बुधवारी (6 फेब्रुवारी) कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. 

भारतात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या अधिक असून व्हॉट्सअ‍ॅपचे 20 कोटी युजर्स आहेत. कंपनीसाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कंपनीचे जगभरात एकूण 1.5 अब्ज युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिकेशनचे प्रमुख कार्ल वूग यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रस्तावित नियमांमध्ये मेसेजसचा शोध घेणे ही सर्वात मोठी समस्या आहे.  तसेच स्त्रोताचा उगम शोधण्यावर भर देण्याबाबत प्रस्तावित नियमांमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. 

फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअ‍ॅप मूलभूतरित्या एंड-टू-एंड एनक्रिप्शन करते. याचा अर्थ पाठवणारा आणि प्राप्त करणारा हे दोघेच मेसेज वाचू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपलाही ते मेसेज वाचता येत नाहीत. तसेच जगभरातील लोकांना जी गोपनीयता हवी आहे, ती प्रस्तावित बदलाला अनुरूप नाही. आम्ही एंड-टू-एंड एनक्रिप्शन पुरवतो. पण नव्या नियमानुसार व्हॉट्सअ‍ॅपमध्ये बदल करावे लागणार अशा स्थितीत मेसेज सेवा आपल्या सध्याच्या रूपात देता येणार नाही, असे वूग यांनी सांगितले.

WhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का?नवे नियम लागू झाल्यानंतर भारतीय बाजारातून बाहेर पडण्याची शक्यता वूग यांनी  फेटाळली नाही. एंड-टू-एंड एनक्रिप्शन फिचरमुळे तपास यंत्रणांना अफवा पसरवणाऱ्यांपर्यंत पोहोचणे कठीण जाते. सोशल मीडिया प्लॅटफार्मसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे प्रस्तावित नियमाअंतर्गत त्याच्या सेवांचा दुरूपयोग आणि हिंसा पसरवणाऱ्यांपासून रोखण्यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन करावे लागेल. 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपIndiaभारतtechnologyतंत्रज्ञान