WhatsApp चॅटिंगची रंगत वाढणार, फेसबुक-इंस्टाग्रामवरील भन्नाट फिचर होणार सादर
By सिद्धेश जाधव | Updated: September 6, 2021 19:30 IST2021-09-06T19:29:57+5:302021-09-06T19:30:08+5:30
WhatsApp Update: WhatsApp सध्या नवीन फिचरवर काम करत आहे. या फिचरमुळे आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामप्रमाणे मसेजेसना इमोजी रिअॅक्शन देता येतील.

WhatsApp चॅटिंगची रंगत वाढणार, फेसबुक-इंस्टाग्रामवरील भन्नाट फिचर होणार सादर
WhatsApp ची टीम सतत नवनवीन फीचर्सवर काम करत असते. यातील काही फीचर्स अॅपची उपयुक्तता वाढवतात तर काही चॅटिंग मजेशीर करतात. आता अजून एका नवीन फिचरवर लोकप्रिय मेसेंजर काम करत आहे. या फिचरचे नाव मेसेज रिअॅक्शन असेल. या नवीन फिचरचा एक स्क्रीनशॉट समोर आला आहे, त्यातून या फीचरचा उपयोग दिसून येतो.
हे नवीन फीचर आल्यानंतर युजर चॅटमध्ये आलेल्या कोणत्याही मेसेजवर रिअॅक्शन किंवा इमोजी रिअॅक्शन देऊ शकतील. व्हॉट्सअॅप iOS युजर्ससाठी चॅट बबल रीडिजाईन करण्याचे देखील काम करत आहे. तसेच मल्टी-डिवाइस युजर्सना लवकरच नवीन आर्काइव इंटरफेस देखील बघायला मिळू शकतो.
WhatsApp च्या नवनवीन फीचरवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo ने अलीकडेच एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे. यात आगामी मेसेज रिअॅक्शन फीचर म्हणजेच इमोजी रिअॅक्शन फीचरची माहिती मिळाली आहे. मेसेजवरील रिअॅक्शन खाली असलेल्या एका छोट्या रिअॅक्शन्स डायलॉगमध्ये दिसतील. विशेष म्हणजे ग्रुपमध्ये मेसेज पाठवल्यास ग्रुप मधील सर्वांच्या रिअॅक्शन्स इथे दिसतील. हे फिचर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आधीपासून उपलब्ध आहे. सध्या हे फिचर डेव्हलपमेंटमध्ये असून लवकरच हे सर्वांसाठी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले आहे.