लै भारी! WhatsApp वरून पाठवता येणार हाय क्वॉलिटी चित्रपट; फाईल शेयरिंगसाठी अतिरिक्त अॅपची गरज नाही
By सिद्धेश जाधव | Updated: March 28, 2022 20:14 IST2022-03-28T20:14:20+5:302022-03-28T20:14:41+5:30
WhatsApp वर अनेक नवीन फीचर येत आहेत. काही दिवसांपूर्वी मेसेज रिअॅक्शन फीचरची भर टाकण्यात आली होती.

लै भारी! WhatsApp वरून पाठवता येणार हाय क्वॉलिटी चित्रपट; फाईल शेयरिंगसाठी अतिरिक्त अॅपची गरज नाही
WhatsApp वर सतत नवनवीन फिचर येत असतात. काही दिवसांपूर्वी मेटानं आपल्या लोकप्रिय मेसेजिंग अॅपमध्ये मेसेज रिअॅक्शन फिचर जोडलं होता. आता एक जबरदस्त फीचर लवकरच युजर्सच्या भेटीला येणार आहे. या फिचरची मागणी WhatsApp लाँच झाल्यापासून केली जात आहे. हे फीचर सध्या बीटा व्हर्जनमध्ये दिसलं आहे. हे फीचर आल्यानंतर युजर अॅपच्या माध्यमातून एकाचवेळी 2GB ची फाईल शेयर करू शकतील.
WhatsApp बीटा युजर सध्या 2GB ची फाईल सेंड करू शकत आहेत, अशी माहिती WABetaInfo नं दिली आहे. हे फीचर Android अॅप व्हर्जन 2.22.8.5, 2.22.8.6 आणि 2.22.8.7 मध्ये मिळेल. सध्या याची चाचणी दक्षिण अमेरिकेतील बीटा युजर्ससोबत सुरु आहे. त्यानंतर जगभरातील बीटा युजर्सना हे फिचर मिळेल आणि शेवटी स्टेबल व्हर्जन सर्वांसाठी रोल आउट केलं जाईल.
सध्या व्हॉट्सअॅपवरून 100MB पेक्षा मोठी एक फाईल पाठवता येत नाही. यासाठी युजर्स विविध फाईल शेयरिंग अॅप्सचा वापर करतात. ते आता व्हॉट्सअॅपचा वापर करू लागतील आणि एक अतिरिक्त अॅप मोबाईल मधून कमी होईल. व्हॉट्सअॅपचं हे नवं फीचर Android सोबत iOS युजरसाठी देखील रोल आउट केलं जाईल. सध्याच्या स्मार्टफोन्समध्ये हाय रिजोल्यूशनचे फोटोज आणि व्हिडीओज कॅप्चर केले जातात. या फिचरमुळे युजर्स थेट ते व्हिडीओज आपल्या कॉन्टॅक्ट सोबत शेयर करू शकतील.