'या' स्मार्टफोन्समध्ये वापरता येणार नाही WhatsApp; यादीत तुमच्या फोनचा समावेश तर नाही ना?

By सिद्धेश जाधव | Published: September 27, 2021 05:28 PM2021-09-27T17:28:58+5:302021-09-27T17:29:42+5:30

WhatsApp Feature Update: 1 नोव्हेंबरपासून WhatsApp अनेक जुन्या फोन्सचा सपोर्ट बंद करणार आहे. यात LG आणि Samsung सह इतर अनेक कंपन्यांच्या फोन्सचा समावेश आहे.

Whatsapp will not support on these smartphone from november included lg samsung huawei phone check full list  | 'या' स्मार्टफोन्समध्ये वापरता येणार नाही WhatsApp; यादीत तुमच्या फोनचा समावेश तर नाही ना?

'या' स्मार्टफोन्समध्ये वापरता येणार नाही WhatsApp; यादीत तुमच्या फोनचा समावेश तर नाही ना?

Next

व्हॉट्सअ‍ॅपने मेसेजिंग सर्विस अनेक युजर्ससाठी बंद करण्याची घोषणा केली आहे. काही Android युजर्सना आता ही सेवा वापरता येणार नाही. हा बदल येत्या 1 नोव्हेंबरपासून अंमलात आणला जाईल. पुढील महिन्यापासून जुन्या अँड्रॉइड फोन्सवरील व्हॉट्सअ‍ॅपचा सपोर्ट बंद केला जाईल. अशा युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेजस, व्हॉइस कॉल्स आणि व्हीडीओ कॉल्स करता येणार नाहीत, तसेच नवीन अपडेट देखील मिळणार नाहीत. 

WhatsApp कोणत्या डिवाइसेसवर वापरता येईल 

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या वेबसाईटवर सपोर्टेड डिव्हाइसेसची माहिती दिली आहे. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये मेसिजिंग अ‍ॅपमध्ये अनेक नवीन फिचर देण्यात येतील. परंतु त्याचबरोबर अ‍ॅप फक्त Android 4.1 आणि त्यावरील ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या डिवाइसला सपोर्ट करेल. यापेक्षा जुने अँड्रॉइड व्हर्जन असलेल्या फोन्सना WhatsApp अपडेट मिळणार नाही. 

WhatsApp ने दिलेल्या माहितीनुसार सध्या अ‍ॅप Android 4.1 आणि त्यानंतरच्या व्हर्जनला सपोर्ट करतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सध्या व्हॉट्सअ‍ॅप 2013 नंतर बाजारात आलेल्या फोन्सवर वापरता येईल. ज्यांच्याकडे जुना फोन आहे त्यांना नवीन अपडेट मिळणार नाही. जर तुमच्याकडे जुना फोन असेल तर तुम्ही एक नवीन स्मार्टफोन विकत घेतला पाहिजे.  

या फोन्सवर वापरता येणार नाही व्हॉट्सअ‍ॅप 

LG Optimus L3, Samsung Galaxy SII, the Galaxy Core, the ZTE Grand S Flex आणि Huawei Ascend G740 सारख्या खूप जुन्या फोनमध्ये WhatsApp वापरता येणार नाही. तसेच Android व्हर्जन 4.0.4 आणि त्यापेक्षा जुन्या व्हर्जनवर काम करत असेलल्या फोनवर 1 नोव्हेंबर, 2021 पासून लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप सपोर्ट करणार नाही. युजर्स सपोर्टेड डिवाइसवर स्विच करू शकतात आणि चॅट हिस्ट्री ट्रान्सफर करू शकतात. 

Web Title: Whatsapp will not support on these smartphone from november included lg samsung huawei phone check full list 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.