शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त! WhatsApp युजर्सनाही फेसबुकप्रमाणे ठेवता येणार 'कव्हर फोटो'; 'असं' आहे नवं अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 16:59 IST

Whatsapp work on cover photo : WhatsApp युजर्ससाठी एक खूशखबर आहे. WhatsApp वरही फेसबुकसारखा कव्हर फोटो ठेवता येणार आहे.

नवी दिल्ली - इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp चा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. आता WhatsApp युजर्ससाठी एक खूशखबर आहे. WhatsApp वरही फेसबुकसारखा कव्हर फोटो ठेवता येणार आहे. बिझनेस अकाऊंटसाठी कव्हर फोटो सेट करण्यावर सध्या काम सुरू आहे. WhatsApp च्या सर्व घडामोडींचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo ने अलीकडेच या फीचरची माहिती दिली आहे. "जेव्हा हे फीचर बीटा युजर्ससाठी सक्षम केले जाईल, तेव्हा व्यवसाय प्रोफाईल सेटिंग्जमध्ये काही बदल केले जातील" असं WABetaInfo ने म्हटलं आहे. 

WABetaInfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार WhatsApp युजर्सच्या बिझनेस अकाऊंटच्या सेटिंग्जमध्ये कॅमेरा बटण आणण्याची योजना आखत आहे. याद्वारे युजर्स कव्हर फोटो निवडू शकतात किंवा नवीन फोटोवर क्लिक करून कव्हर फोटो तयार करू शकतात. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील एखादा युजर तुमच्या बिझनेस प्रोफाईलला भेट देईल तेव्हा त्यांना तुमच्या प्रोफाईल फोटोसह तुमचा नवीन कव्हर फोटो दिसेल. WhatsApp बिझनेस अकाउंट्सवर कव्हर फोटो सेट करण्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नवीन अपडेटमध्ये कम्युनिटी अपडेट आणण्यावरही काम करत आहे. 

कम्युनिटी एक खासगी प्लॅटफॉर्म आहे, जिथे खासगी प्लॅटफॉर्मपेक्षा ग्रुप अ‍ॅडमिनला अधिक अधिकार असतील. WhatsApp कम्युनिटी हे ग्रुप चॅटसारखे असेल आणि ग्रुप अ‍ॅडमिन्स समुदायातील इतर ग्रुपशी लिंक करू शकतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी WhatsApp ने कॉन्टॅक्ट सेक्शनच्या इंटरफेसला बदलले आहे. सध्या हे फीचर अँड्राइड बीटा व्हर्जन वापरणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध आहे. या फीचरला Frequently contacted आणि Recent chats अशा दोन भागात विभागले आहे. नावावरूनच लक्षात येते की, वारंवार ज्या युजर्सशी चॅट करता, ते युजर्स Frequently contacted मध्ये दिसतात. तर नुकतेच ज्या युजर्सशी चॅट केले आहे ते Recent chats मध्ये दिसतात. परंतु. युजर्सला नवीन बदल आवडलेले नाहीत. कंपनी पुन्हा जुनी कॉन्टॅक्ट लिस्ट आणण्याची शक्यता आहे.

अरे व्वा! Android युजर्ससाठी WhatsApp आणतंय खास नवं फीचर; चॅटींग करणं होणार आणखी सोपं

WhatsApp ने गुगल प्ले बीटा प्रोग्रामच्या माध्यमातून अँड्राईड यूजर्ससाठी एक नवीन अपडेट रोलआउट करण्यास सुरू केले आहे. हे अपडेट अ‍ॅप व्हर्जन 2.22.5.9 पर्यंत दिले आहे. रिपोर्टनुसार, युजर्सच्या बॅकलॅशनंतर WhatsApp आता जुन्या इंटरफेसला रिस्टोर करत आहे. कंपनी जुन्या कॉन्टॅक्ट लिस्ट इंटरफेसला पुन्हा रोलआउट करत आहे. मात्र, सर्वांसाठी अपडेट उपलब्ध होण्यासाठी वेळ लागेल. WhatsApp ने अँड्राईड प्लॅटफॉर्मवर बीटा युजर्ससाठी ग्रुप वॉइस कॉल दरम्यान दिसणाऱ्या अ‍ॅप विंडोचे डिझाइन देखील बदलण्यास सुरुवात केली आहे. आयओएस आणि अँड्राईड युजर्सला बीटा अपडेटमध्ये डिझाइनमध्ये झालेला बदल आधीच पाहायला मिळत आहे. याशिवाय कंपनी ग्रुप कॉल दरम्यान सर्व युजर्ससाठी वॉइस वेवफॉर्म देखील उपलब्ध करत आहे. वॉइस वेवफॉर्म हे वॉइस नोट्समध्ये ज्याप्रमाणे दिसतात, तसे असतील. एका रिपोर्टनुसार, डिझाइनमध्ये करण्यात आलेले बदल हे खूपच कमी असतील. परंतु, हे बदल पेजला एक नवीन लूक देतात. तसेच, सध्या नवीन डिझाइन केवळ काही अँड्राईड बीटा टेस्टरसाठीच उपलब्ध आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपFacebookफेसबुक