बघितल्यावर आपोआप डिलीट होणार फोटो आणि व्हिडीओ; WhatsApp वरील हे शानदार फीचर सर्वांसाठी उपलब्ध
By सिद्धेश जाधव | Updated: August 4, 2021 16:53 IST2021-08-04T16:50:59+5:302021-08-04T16:53:41+5:30
Whatsapp View Once Feature: व्यू वन्स फीचरमध्ये पाठवलेले फोटो आणि व्हिडीओ एकदा बघितल्यावर त्वरित डिलीट होतील.

बघितल्यावर आपोआप डिलीट होणार फोटो आणि व्हिडीओ; WhatsApp वरील हे शानदार फीचर सर्वांसाठी उपलब्ध
गेल्याच महिन्यात बातमी आली होती कि WhatsApp मेसेंजर View Once फिचरवर काम आहे. याआधी बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध असलेले हे फिचर आता सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे. व्यू वन्स फीचरमध्ये पाठवलेले फोटो आणि व्हिडीओ एकदा बघितल्यावर त्वरित डिलीट होतील. हे फिचर इन्स्टाग्राममध्ये आधीपासून देण्यात आले आहे, लोकप्रिय मेसेंजरने मात्र याचा वापर उशिरा केला असे म्हणता येईल.
View Once फिचर म्हणजे काय?
View Once फिचर मिळाल्यावर युजर्सना फोटो किंवा व्हिडीओ पाठवताना मेसेज प्रीव्यू सोबत छोटा View Once (व्यू वन्स) बटण दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर हे फिचर अॅक्टिव्हेट होईल आणि पाठवलेला फोटो किंवा व्हिडीओ फक्त रिसिव्हरला फक्त एकदाच बघता येईल. मेसेज पाठवणाऱ्या युजरला मेसेज डिलिवर, सीन आणि ओपन्ड असे मेसेजचे स्टेटस दिसतील. म्हणजे रिसिव्हरने हा मेसेज उघडून बघितला कि नाही हे देखील समजेल.
रिसिव्हर या मेसेजचा स्क्रिनशॉट घेऊ शकतील कारण व्हाॅट्सअॅपवर अजूनतरी स्क्रीनशॉट डिटेक्शन फिचर देण्यात आले नाही. नवीन View Once फीचर ग्रुपमध्ये देखील वापरता येईल. ग्रुपमधील सर्व मेम्बर्स फक्त एकदाच या फिचरच्या माध्यमातून पाठवलेला मेसेज बघू शकतील. या फिचरचा वापर करून मेसेज पाठवण्यासाठी View Once फिचर तुमच्या व्हाॅट्सअॅपवर असले पाहिजे परंतु View Once मेसेजेस रिसिव्ह करण्यासाठी या फिचरची आवश्यकता असणार नाही.