व्हॉट्स अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी; 'हे' लोकप्रिय फीचर बंद करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 07:16 PM2021-09-21T19:16:42+5:302021-09-21T19:17:02+5:30

व्हॉट्स अ‍ॅपकडून लोकप्रिय फीचर बंद; नव्या अपडेटमध्ये रिप्लेसमेंट मिळण्याची शक्यता

Whatsapp Removed Whatsapp Messenger Rooms Shortcut Features Which Allow Up To 50 Participants To Join A Group Video Call On Facebook | व्हॉट्स अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी; 'हे' लोकप्रिय फीचर बंद करण्याचा निर्णय

व्हॉट्स अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी; 'हे' लोकप्रिय फीचर बंद करण्याचा निर्णय

Next

व्हॉट्स अ‍ॅप कायम नवनवीन फीचर आणत असतं. अ‍ॅप अधिकाधिक करण्याचा प्रयत्न व्हॉट्स अ‍ॅपकडून सातत्यानं सुरू असतो. कंपनीनं नुकतंच मल्टी डिव्हाईस सपोर्ट नॉन बिटा यूजर्ससाठी उपलब्ध करून दिलं. मात्र WABetaInfoनं दिलेल्या वृत्तानुसार, व्हॉट्स अ‍ॅपनं एक लोकप्रिय फीचर हटवलं आहे. वर्षभरापूर्वी कंपनीनं हे फीचर सुरू केलं होतं. 

वर्षभरापूर्वी व्हॉट्स अ‍ॅपनं मेसेंजर रुम तयार करण्यासाठी एक उपयोगी शॉर्टकर्ट उपलब्ध करून दिला. त्यामुळे ५० जणांना फेसबुकवर ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी होता यायचं. मात्र आता हा पर्याय हटवून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चॅट शेअर शीटमधूनही हा पर्याय डिलीट करण्यात येत आहे. एँड्रॉईड आणि आयओएसच्या व्हॉट्स अ‍ॅप बिटावरील कॉल सेक्शनमधूनही पर्याय हटवण्यात येणार आहे.

VIDEO: हाण की बडीव! एका तरुणासाठी तीन तरुणी भिडल्या; कानशिलात लगावल्या, झिंज्या उपटल्या

या फीचरमुळे व्हॉट्स अ‍ॅपचे अँड्रॉईड वापरकर्ते व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून एक रूम तयार करू शकतात आणि त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. WABetaInfoनं दिलेल्या वृत्तानुसार, या फीचरचा जास्त वापर होत नसल्यानं व्हॉट्स अ‍ॅपनं ते हटवण्याचा निर्णय घेतला. 'वापरकर्ते कोणत्या फीचरचा वापर करतात त्याचा तपशील व्हॉट्स अ‍ॅपकडून वेळोवेळी पाहिला जातो. एखादं फीचर यशस्वी होत नसेल तर त्यात बदल केले जातात. या फीचरचा जास्त वापर होत असल्याचं लक्षात आल्यानं ते हटवलं गेलं असावं. पुढील अपडेटमध्ये त्यासाठी चांगलं रिप्लेसमेंट मिळू शकतं,' असं WABetaInfoनं वृत्तात म्हटलं आहे. 

Web Title: Whatsapp Removed Whatsapp Messenger Rooms Shortcut Features Which Allow Up To 50 Participants To Join A Group Video Call On Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.